मुक्तपीठ टीम
केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने म्हणजेच कॅटच्या आदेशानुसार घटस्फोटानंतर मुलगीही पालकांच्या कौटुंबिक निवृत्ती वेतनासाठी पात्र आहे. घटस्फोटीत स्त्रियांच्या बाजुने निर्णय देत कॅटने केंद्र सरकारने कौटुंबिक निवृत्ती वेतनाबाबत जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमदेखील स्पष्ट केले आहेत.
केंद्र सरकार आणि उत्तर रेल्वेचे म्हणणे धुडकावले!
- कॅटने केंद्र सरकार आणि उत्तर रेल्वेचे म्हणणे नाकारले.
- आईवडिलांच्या मृत्यूनंतर घटस्फोटाचा निर्णय घेतल्यास मुलगी कौटुंबिक निवृत्ती वेतनासाठी पात्र नाही असे त्यांचे मत होते.
- कॅटचे सदस्य मोहम्मद जमशेद यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले.
- घटस्फोटाचा निर्णय घेण्यासाठी अनेक वर्षे लागतात, त्यामुळे आईवडिलांच्या जीवन काळात घटस्फोट घेतलेल्या मुलीला निवृत्ती वेतनाचा हक्क मागणे अन्यायकारक आहे.
- ते म्हणाले की फक्त हे पाहणे आवश्यक आहे की पालक जिवंत असताना घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली आहे का.
- या टिप्पणी सह कॅटने रेल्वेला आदेश दिला आहे की, याचिकाकर्ता अनिताला तिच्या आईच्या मृत्यु नंतर कौटुंबिक निवृत्ती वेतन द्यावे.
कॅटने म्हटले आहे की, या केसचा प्रश्न उपस्थित झाला होता. कौटुंबिक वादामुळे याचिकाकर्त्याने न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती तेव्हा तिची आई जिवंत होती. मृत्यू होण्यापपुर्वी तिच्या आईने सर्व संपत्ती आणि मालमत्ता तिच्या मुलीच्या नावावर केली होती. या गोष्टी लक्षात घेऊन कॅटने म्हटले आहे की, मुलीला तिच्या आईच्या मृत्यूनंतर कौटुंबिक निवृत्ती वेतन मिळण्याचा हक्क आहे.
काय आहे प्रकरण?
- याचिकाकर्त्या अनिताचे वडील उत्तर रेल्वेमध्ये नोकरी करत होते.
- १९९४ मध्ये त्यांचे निधन झाले.
- अनुकंपा तत्त्वावर याचिकाकर्त्याच्या आईला रेल्वेत नोकरी मिळाली.
- २०१० मध्ये अनिताचे लग्न झाले.
- जुलै २०१४ मध्ये तिने पतीपासून घटस्फोटासाठी हरियाणा न्यायालयात दावा दाखल केला.
- २०१५ मध्ये, अनिताच्या घटस्फोटाचा निर्णय येण्यापूर्वी, तिच्या आईचे निधन झाले.
- त्यांच्याकडे स्वतःच्या आणि मुलाच्या उदरनिर्वाहासाठी कोणतेही साधन नव्हते.
- म्हणून त्यांनी रेल्वेमध्ये अहवाल सादर केला आणि घटस्फोटित मुलगी असल्याच्या आधारावर कौटुंबिक निवृत्ती वेतनाची मागणी केली.
- कॅटने रेल्वेच्या डिसेंबर २०१८ च्या आदेशालाही रद्द केले.
- ज्यात असे म्हटले होते की याचिकाकर्त्याने तिच्या आईच्या मृत्यूनंतर घटस्फोट घेतला असल्याने तिला कौटुंबिक निवृत्ती वेतन दिले जाऊ शकत नाही.