Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राहुल गांधींमागे ईडीपिडा काँग्रेससाठी बुस्टर डोस?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Congress Agitation

मुक्तपीठ टीम

नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सोमवारनंतर मंगळवारीही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली. राहुल गांधींच्या समर्थनार्थ देशभरातील कार्यकर्ते रस्त्यावर उतरली. त्यामुळे एक प्रकारे राहुल गांधींमागील ईडीपिडा काँग्रेससाठी फायद्याची ठरल्याचं मानलं जात आहे. काही माध्यमांच्या मते या ईडीविरोधी आंदोलनांमुळे ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या भारत जोडो पदयात्रेसाठीची तयारीही होत आहे.

काँग्रेसलाच भाजपा घाबरत असल्याने कारवाई, असा संदेश देण्याचा प्रयत्न!

  • राहुल गांधींना चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहावे लागल्याने काँग्रेससाठी सोमवारचा दिवस हा महत्वाचा होता.
  • काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची अद्याप चौकशी झालेली नाही.
  • राहुल गांधी यांची ईडीसमोर हजेरी मोठ्या आंदोलनाच्या रूपात करण्यासाठी काँग्रेसने गेल्या आठवड्यातच मोठी योजना आखण्यास सुरुवात केली होती.
  • याबाबत रविवारी काँग्रेसच्या तमाम बड्या नेत्यांनी देशातील विविध राज्यांत पत्रकार परिषदा घेतल्याच शिवाय सोमवारी होणाऱ्या मोठ्या आंदोलनाची संपूर्ण रूपरेषाही तयार केली.
  • काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस रणदीप सुरजेवाला म्हणतात की, काँग्रेस सत्याची लढाई लढत आहे.
  • यापुढेही हा लढा सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले.
  • सुरजेवाला म्हणाले की, काँग्रेसची रणनीती आणि देशभरात होत असलेल्या प्रचंड निदर्शनांमुळे देशाची राजधानी दिल्लीचे मोदी सरकारने छावणीत रूपांतर केले आहे.
  • काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शक्तीची भीतीच भाजपाला सतावत आहे.

ईडी कारवाईमुळे काँग्रेसला फायदा

  • काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या ईडीविरोधी आंदोलनातून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे की काँग्रेस आगामी काळातही आक्रमक भूमिका घेण्यास सक्षम आहे.
  • ही निदर्शने राजकीयदृष्ट्या किती फायद्याची ठरतील, हे आगामी निवडणुकांमधूनही कळेल.
  • तरीही ईडीविरोधी आक्रमकता काँग्रेससाठी बूस्टर डोस मानला जाऊ शकतो.
  • सोमवारी दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सत्यासाठी आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

Tags: Booster DoseCongressEDNational Herald caserahul gandhiईडीकाँग्रेसबुस्टर डोसराहुल गांधी
Previous Post

यूपीतील बुलडोझर कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालय काय करणार?

Next Post

देहूत अजित पवारांना बोलू दिले नाही, महाराष्ट्राचा अपमान झाल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप! राजकीय वाद पेटला

Next Post
Dehu

देहूत अजित पवारांना बोलू दिले नाही, महाराष्ट्राचा अपमान झाल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप! राजकीय वाद पेटला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!