मुक्तपीठ टीम
नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सोमवारनंतर मंगळवारीही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली. राहुल गांधींच्या समर्थनार्थ देशभरातील कार्यकर्ते रस्त्यावर उतरली. त्यामुळे एक प्रकारे राहुल गांधींमागील ईडीपिडा काँग्रेससाठी फायद्याची ठरल्याचं मानलं जात आहे. काही माध्यमांच्या मते या ईडीविरोधी आंदोलनांमुळे ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या भारत जोडो पदयात्रेसाठीची तयारीही होत आहे.
काँग्रेसलाच भाजपा घाबरत असल्याने कारवाई, असा संदेश देण्याचा प्रयत्न!
- राहुल गांधींना चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहावे लागल्याने काँग्रेससाठी सोमवारचा दिवस हा महत्वाचा होता.
- काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची अद्याप चौकशी झालेली नाही.
- राहुल गांधी यांची ईडीसमोर हजेरी मोठ्या आंदोलनाच्या रूपात करण्यासाठी काँग्रेसने गेल्या आठवड्यातच मोठी योजना आखण्यास सुरुवात केली होती.
- याबाबत रविवारी काँग्रेसच्या तमाम बड्या नेत्यांनी देशातील विविध राज्यांत पत्रकार परिषदा घेतल्याच शिवाय सोमवारी होणाऱ्या मोठ्या आंदोलनाची संपूर्ण रूपरेषाही तयार केली.
- काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस रणदीप सुरजेवाला म्हणतात की, काँग्रेस सत्याची लढाई लढत आहे.
- यापुढेही हा लढा सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले.
- सुरजेवाला म्हणाले की, काँग्रेसची रणनीती आणि देशभरात होत असलेल्या प्रचंड निदर्शनांमुळे देशाची राजधानी दिल्लीचे मोदी सरकारने छावणीत रूपांतर केले आहे.
- काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शक्तीची भीतीच भाजपाला सतावत आहे.
ईडी कारवाईमुळे काँग्रेसला फायदा
- काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या ईडीविरोधी आंदोलनातून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे की काँग्रेस आगामी काळातही आक्रमक भूमिका घेण्यास सक्षम आहे.
- ही निदर्शने राजकीयदृष्ट्या किती फायद्याची ठरतील, हे आगामी निवडणुकांमधूनही कळेल.
- तरीही ईडीविरोधी आक्रमकता काँग्रेससाठी बूस्टर डोस मानला जाऊ शकतो.
- सोमवारी दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सत्यासाठी आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले.