मुक्तपीठ टीम
सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्स म्हणजेच सी-डॉट आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडवान्सड कॉम्प्युटिंग म्हणजेच सी-डॅक यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. बंगळुरू येथे सेमीकॉन इंडिया २०२२ कार्यक्रमात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. स्वदेशी तांत्रिक रचना आणि विकासाला चालना देण्यासाठी दूरसंचार आणि आयसीटीच्या विविध क्षेत्रात एकत्र काम करण्यासाठी या दोन भारतीय तंत्र कंपन्यांनी हात मिळवले आहेत. त्या आता संयुक्तपणे 4G/5G, ब्रॉडबँड, IOT/M2M, पॅकेट कोअर, कॉम्प्युटिंगवर काम करणार आहेत. ज्याचा फायदा देशाला स्वदेशी तंत्रज्ञान मिळवण्यात होईल.
या सामंजस्य कराराच्या स्वाक्षरी समारंभाला सी-डॉटचे संचालक डॅनियल जेबराज आणि सी-डॅकचे महासंचालक ई. मागेश, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री आणि केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर आणि दोन्ही संस्थांमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यामुळे दोन्ही संस्थांना त्यांच्या संबंधित क्षेत्रात परस्परांच्या सामर्थ्याचा लाभ घेण्यास मदत होईल.
C-DOT आणि C-DAC या दोघांनी 4G/5G, ब्रॉडबँड, IOT/M2M, पॅकेट कोअर, कॉम्प्युटिंग आदी क्षेत्रातील कामाची ओळख आणि विकास यासाठी सहकार्य आणि संयुक्तपणे काम करण्यास सहमती दर्शवली आहे. जेव्हा विशिष्ट भूमिका आणि जबाबदाऱ्यांची विभागणी करणे आवश्यक असेल तेव्हा विशिष्ट प्रकल्प करारावर स्वाक्षरी केली जाईल.
पाहा व्हिडीओ: