Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रस्त्यांवरील भीषण अपघातात का वाढ? नाशिकमधील बस जळीत मृत्यू कांडानंतर पुन्हा चर्चा…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
bus accident nashik

मुक्तपीठ टीम

औरंगाबाद येथील रस्त्यावर खासगी बस आणि डंपर यांच्या झालेल्या अपघातानंतर बसने पेट घेतला. या बस अपघातात १२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात एका लहान मुलासह आईचाही मृत्यू झाला आहे. ही बस यवतमाळहून मुंबईच्या दिशेने जात होती. या अपघाताप्रमाणेच भीषण अपघात वाढल्याचे निरीक्षण वाहतूक क्षेत्रातील जाणकार नोंदवतात. त्यांच्या मते जास्त बळींमुळे अशा अपघातांची चर्चा होते. पण अनेक अपघात दुर्लक्षित राहतात. या अपघाताच्या कारणांचा शोध घेतला असता अनेक गंभीर बाबी पुढे आल्या.

कसा झाला अपघात?

  • बस, डंपर व टेम्पो यांच्यात हा विचित्र अपघात झाला.
  • अपघातानंतर डिझेलची टाकी फुटल्याने बसने पेट घेतल्याचे सांगितले जाते.
  • अपघातग्रस्त बस चिंतामणी ट्रॅव्हलची असल्याची प्राथमिक माहिती आहे.
  • पहाटे पाचच्या सुमारास पंचवटीतील हॉटेल मिरची चौकात तिला कोळश्याने भरलेल्या डंपरने धडक दिली.
  • अपघातानंतर बसने पेट घेतला.
  • गाठ झोपेत असणारे प्रवाशांचा अक्षरश कोळसा झाला. बसमध्ये ३० हून अधिक प्रवासी होते.
  • यामध्ये सुमारे ११ जणांचा मृत्यू झाला.
  • त्यांच्यामध्ये एक लहान मुलासह आई आहे.
  • तर २५ जण जखमी झाले आहेत.
  • काहींनी उड्या मारल्याने ते बचावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
  • अर्धा ते पाऊण तास पेटलेली बस विझवण्याचे प्रयत्न सुरू होते.
  • मृत प्रवाशांचे मृतदेह मनपाच्या सिटीलिंक बसमधून हलविण्यात आले.

अपघातांमध्ये चिंताजनक वाढ का?

  • गेल्या काही महिन्यांमध्ये रस्ते अपघातांमध्ये चिंताजनक म्हणावी अशी वाढ झाली आहे.
  • नाशिकच्या अपघातात जास्त बळी गेल्यामुळे सकाळपासून चर्चा सुरु झाली आहे, तशीच चर्चा सायरस मेस्त्रींसारख्या मोठ्या उद्योगपतीच्या मृत्यूमुळे पालघरच्या अपघाताचीही झाली होती.
  • मात्र, राज्यभर असे अनेक अपघात रोजच होत असतात.
  • सायरस मिस्त्रींच्या अपघाती मृत्यूनंतर अहमदाबाद महामार्गावरील २६ ब्लॅक स्पॉटची चर्चा झाली, पुढे काहीच झाले नाही.
  • नाशिकच्या अपघातातील बस ही स्लिपर कोच होती. अशा बसची बांधणीत लाकूड, आणि आतमध्ये कपड्यांचा मुबलक वापर असतो. जे ज्वालाग्राही असतात.
  • आरटीओकडून अशा बसेसच्या सुरक्षिततेची म्हणावी तशी तपासणी होत नाही.
  • महामार्गांवर मोठ्या गाड्या नियमांचे पालन न करता बेफाम वेगानेही वाहतूक होते.
  • काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अपघातासाठी रस्यांच्या अवस्थेला जबाबदार ठरवले आहे, ते म्हणालेत की राज्यातील ईडी सरकारने आघाडी सरकारने सुरु केलेली कामे स्थगित केली. त्यामुळे रस्त्यांचीही वाईट अवस्था आहे.

नाशिकमधील अपघातस्थळी या आधीही अपघात

  • नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी अपघातस्थली या आधीही खूप अपघात झाल्याचे सांगितले.
  • नाशिक रिंगरोडलाही गतिरोधकांची आवश्यकता आहे, चौकांमध्ये अतिक्रमणे झाल्याने रस्ते अरुंद झालेत.
  • त्यामुळे अपघात टाळण्यासाठी कडक कारवाईची गरज असल्याचं सांगितलं.

क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी!

  • चिंतामणी ट्रॅव्हल्सची या बसची क्षमता ३० प्रवाशांची होती.
  • पण या बसमध्ये अपघाताच्यावेळी ४०पेक्षाही जास्त, काहींच्या माहितीनुसार ४८ प्रवाशी होते.
  • क्षमतेपेक्षा जास्त भरलेले प्रवाशी हेही अपघाती बळी वाढण्याचे कारण ठरले असावे.
  • पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रवाशी जास्त असल्याची माहिती देत, चौकशीची घोषणा केली.

मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची नुकसान भरपाई जाहीर

  • मुख्यमंत्री शिंदे नाशिकच्या दिशेने रवाना झाले आहेत. जखमींवर उपचार करण्याला प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच
  • या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यासोबतच सरकारने ५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.
  • याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.

Tags: Bus AccidentDumpernashikडंपरनाशिकबस अपघात
Previous Post

सीडॅक अंतर्गत प्रोजेक्ट असोसिएट, मॅनेजर आणि इतर पदांवर ५३० जागांसाठी भरती

Next Post

अॅम्नेस्टी इंडियाची भारतातील मालमत्ता जप्त, मनी लॉंड्रिंगचा आरोप!

Next Post
Amnesty India

अॅम्नेस्टी इंडियाची भारतातील मालमत्ता जप्त, मनी लॉंड्रिंगचा आरोप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!