Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अॅम्नेस्टी इंडियाची भारतातील मालमत्ता जप्त, मनी लॉंड्रिंगचा आरोप!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Amnesty India

मुक्तपीठ टीम

अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी गेल्या काही काळापासून आपल्या कारवाईंमुळे खूप चर्चेत आहे. आता ताज्या कारवाईत ईडीने अॅम्नेस्टी इंडियाची सुमारे १.५४ कोटी रुपयांची मालमत्ता मनी लॉन्ड्रिंग अंतर्गत जप्त केली आहे. अॅम्नेस्टी इंडिया व या संस्थेचे माजी अध्यक्ष आकार पटेल यांना ५१.७२ कोटींच्या आर्थिक हेराफेरीसंदर्भात ईडीने नोटीस पाठवली असून या संस्थेसह अन्य काही संस्थांविरोधात मनी लॉंड्रिंगचे आरोप पत्र दाखल केले असल्याची माहिती ईडीने दिली.

सीबीआयने सांगितले की, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेशी संलग्न असलेल्या चॅरिटेबल ट्रस्टची १.५४ कोटी रुपयांची मालमत्ता मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) जप्त करण्यात आली आहे. ईडीने म्हटले आहे की पीएमएलए अंतर्गत तात्पुरता संलग्नक आदेश जारी करण्यात आला आहे.

सीबीआय एफआयआरच्या आधारे मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल

  • अॅम्नेस्टी इंडियाने फॉरेन कंट्रीब्युशन रेग्युलेशन अॅक्ट म्हणजेच एफसीआरएच्या कथित उल्लंघनाशी संबंधित एका प्रकरणात अॅम्नेस्टी इंटरनॅशनल ट्रस्टसाठी भारतीयांविरुद्ध आदेश जारी केला आहे.
  • सीबीआयच्या एफआयआरच्या आधारे ईडीने अॅम्नेस्टी इंडियाविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.
  • एजन्सीने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया फाऊंडेशन ट्रस्टला २०११-१२ दरम्यान एफसीआरए, २०१० अंतर्गत अॅम्नेस्टी इंटरनॅशनल यूकेकडून परदेशी देणग्या प्राप्त करण्याची परवानगी देण्यात आली होती.

ईडीच्या या माहितीनंतर अॅम्नेस्टी इंडियाने प्रतिक्रिया देताना मनी लाँड्रिंगचे सर्व आरोप फेटाळले असून दमनकारी कायदांचा वापर करत आपल्या विरोधकांचे हातपाय बांधण्याची सत्ताधारी सरकारची ही जुनीच कार्यप्रणाली असल्याचे अॅम्नेस्टी इंडियाने म्हटले आहे.

आकार पटेल यांच्याविरोधात गेल्या एप्रिल महिन्यात सीबीआयने लूकआऊट सर्कुलर जारी करत त्यांना बंगळुरू विमानतळावर रोखून धरले होते. या निर्णयावर आकार पटेल यांनी दिल्लीत न्यायालयात दाद मागितली होती. या न्यायालयाने सीबीआयला फटकारलेही होते. २०२०मध्ये ईडीने अॅम्नेस्टी इंडियाची सर्व बँक खाती गोठवली होती, त्यानंतर अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने भारतातील आपले सर्व कामकाज थांबवले.


Tags: Amnesty IndiaAsset SeizureEDEnforcement DirectorateForeign Contribution Regulation ActMoney Laundering Allegationsmuktpeethअंमलबजावणी संचालनालयअॅम्नेस्टी इंडियाईडीघडलं-बिघडलंफॉरेन कंट्रीब्युशन रेग्युलेशन अॅक्टमनी लॉंड्रिंग आरोपमालमत्ता जप्तमुक्तपीठ
Previous Post

रस्त्यांवरील भीषण अपघातात का वाढ? नाशिकमधील बस जळीत मृत्यू कांडानंतर पुन्हा चर्चा…

Next Post

आमदार-खासदारांचं बहुमत शिंदेंसोबत, पण पक्षातील बहुमत ठाकरेंसोबत! आता निवडणूक आयोग काय करणार?

Next Post
shivsena vs shinde camp

आमदार-खासदारांचं बहुमत शिंदेंसोबत, पण पक्षातील बहुमत ठाकरेंसोबत! आता निवडणूक आयोग काय करणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!