मुक्तपीठ टीम
औरंगाबाद येथील रस्त्यावर खासगी बस आणि डंपर यांच्या झालेल्या अपघातानंतर बसने पेट घेतला. या बस अपघातात १२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात एका लहान मुलासह आईचाही मृत्यू झाला आहे. ही बस यवतमाळहून मुंबईच्या दिशेने जात होती. या अपघाताप्रमाणेच भीषण अपघात वाढल्याचे निरीक्षण वाहतूक क्षेत्रातील जाणकार नोंदवतात. त्यांच्या मते जास्त बळींमुळे अशा अपघातांची चर्चा होते. पण अनेक अपघात दुर्लक्षित राहतात. या अपघाताच्या कारणांचा शोध घेतला असता अनेक गंभीर बाबी पुढे आल्या.
कसा झाला अपघात?
- बस, डंपर व टेम्पो यांच्यात हा विचित्र अपघात झाला.
- अपघातानंतर डिझेलची टाकी फुटल्याने बसने पेट घेतल्याचे सांगितले जाते.
- अपघातग्रस्त बस चिंतामणी ट्रॅव्हलची असल्याची प्राथमिक माहिती आहे.
- पहाटे पाचच्या सुमारास पंचवटीतील हॉटेल मिरची चौकात तिला कोळश्याने भरलेल्या डंपरने धडक दिली.
- अपघातानंतर बसने पेट घेतला.
- गाठ झोपेत असणारे प्रवाशांचा अक्षरश कोळसा झाला. बसमध्ये ३० हून अधिक प्रवासी होते.
- यामध्ये सुमारे ११ जणांचा मृत्यू झाला.
- त्यांच्यामध्ये एक लहान मुलासह आई आहे.
- तर २५ जण जखमी झाले आहेत.
- काहींनी उड्या मारल्याने ते बचावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
- अर्धा ते पाऊण तास पेटलेली बस विझवण्याचे प्रयत्न सुरू होते.
- मृत प्रवाशांचे मृतदेह मनपाच्या सिटीलिंक बसमधून हलविण्यात आले.
अपघातांमध्ये चिंताजनक वाढ का?
- गेल्या काही महिन्यांमध्ये रस्ते अपघातांमध्ये चिंताजनक म्हणावी अशी वाढ झाली आहे.
- नाशिकच्या अपघातात जास्त बळी गेल्यामुळे सकाळपासून चर्चा सुरु झाली आहे, तशीच चर्चा सायरस मेस्त्रींसारख्या मोठ्या उद्योगपतीच्या मृत्यूमुळे पालघरच्या अपघाताचीही झाली होती.
- मात्र, राज्यभर असे अनेक अपघात रोजच होत असतात.
- सायरस मिस्त्रींच्या अपघाती मृत्यूनंतर अहमदाबाद महामार्गावरील २६ ब्लॅक स्पॉटची चर्चा झाली, पुढे काहीच झाले नाही.
- नाशिकच्या अपघातातील बस ही स्लिपर कोच होती. अशा बसची बांधणीत लाकूड, आणि आतमध्ये कपड्यांचा मुबलक वापर असतो. जे ज्वालाग्राही असतात.
- आरटीओकडून अशा बसेसच्या सुरक्षिततेची म्हणावी तशी तपासणी होत नाही.
- महामार्गांवर मोठ्या गाड्या नियमांचे पालन न करता बेफाम वेगानेही वाहतूक होते.
- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अपघातासाठी रस्यांच्या अवस्थेला जबाबदार ठरवले आहे, ते म्हणालेत की राज्यातील ईडी सरकारने आघाडी सरकारने सुरु केलेली कामे स्थगित केली. त्यामुळे रस्त्यांचीही वाईट अवस्था आहे.
नाशिकमधील अपघातस्थळी या आधीही अपघात
- नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी अपघातस्थली या आधीही खूप अपघात झाल्याचे सांगितले.
- नाशिक रिंगरोडलाही गतिरोधकांची आवश्यकता आहे, चौकांमध्ये अतिक्रमणे झाल्याने रस्ते अरुंद झालेत.
- त्यामुळे अपघात टाळण्यासाठी कडक कारवाईची गरज असल्याचं सांगितलं.
क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी!
- चिंतामणी ट्रॅव्हल्सची या बसची क्षमता ३० प्रवाशांची होती.
- पण या बसमध्ये अपघाताच्यावेळी ४०पेक्षाही जास्त, काहींच्या माहितीनुसार ४८ प्रवाशी होते.
- क्षमतेपेक्षा जास्त भरलेले प्रवाशी हेही अपघाती बळी वाढण्याचे कारण ठरले असावे.
- पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रवाशी जास्त असल्याची माहिती देत, चौकशीची घोषणा केली.
मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची नुकसान भरपाई जाहीर
- मुख्यमंत्री शिंदे नाशिकच्या दिशेने रवाना झाले आहेत. जखमींवर उपचार करण्याला प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच
- या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यासोबतच सरकारने ५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.
- याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.