Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

पर्यटनाला चालना देण्यासाठी बीआरओचा सीमावर्ती भागात २६ कॅफे उघडण्याचा नवा उपक्रम

July 2, 2022
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
BRO cafes

मुक्तपीठ टीम

सीमावर्ती भागात हवामान अगदी थंड आणि परिस्थिती अगदी कठीण असते. परंतु या ठिकाणी पर्यटकांची मोठी वर्दळ असते. पर्यनासाठी हे लोक जम्मू-काश्मिर आणि लडाख सारखे प्रदेश निवडतातच. तेथील सुंदरता हेच त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. सीमावर्ती भागात पर्यटनाला चालना देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. देशभरात अशा ७५ ठिकाणी बोर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच बीआरओने कॅफे उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील १२ आणि लडाखमधील १४ अशा एकूण २६ बीआरओ कॅफे उघडण्यात येणार आहेत. बीआरओ कॅफे प्रवासाचा मार्ग आणखी सुलभ करेल. यासोबतच पर्यटकांनाही उत्तम सुविधा मिळणार आहेत.

बीआरओला दुर्गम सीमावर्ती भागात प्रवेश आहे. धोरणात्मक गरजा पूर्ण करण्याव्यतिरिक्त, उत्तर आणि पूर्व सीमांच्या सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी बीआरो महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढला आहे. कठोर हवामान आणि भौगोलिक परिस्थिती असलेल्या ठिकाणी त्याच्या उपस्थितीच्या आधारावर, बीआरओने पर्यटकांना अशा सुविधा देण्याचा निर्णय घेतला.

या योजनेमुळे स्थानिकांना रोजगार मिळणार

  • फूड प्लाझा आणि रेस्टॉरंटमध्ये स्थानिक खाद्यपदार्थ तसेच लोकप्रिय खाद्यपदार्थ उपलब्ध असतील.
  • बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनसोबत मंत्रालयाने १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ७५ ठिकाणी वेसाइड सुविधा उभारण्यास मान्यता दिली आहे, असे संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
  • पर्यटकांना मूलभूत सुविधा पुरविणे हा यामागील उद्देश आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. ४. यासोबतच सीमावर्ती भागात आर्थिक उपक्रमांना चालना मिळेल.

पर्यटकांना मुलभूत सुविधा देण्यासाठी देशभरातील ७५ ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या सुविधांना बीआरओ कॅफे असे नाव दिले जाईल. या वेसाइड सुविधा परवाना आधारावर एजन्सीसह सार्वजनिक खासगी भागीदारी मोडमध्ये विकसित आणि चालवल्या जातील. बीआरओच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांची रचना, बांधणी आणि संचालन केले जाईल.

पर्यटकांना या सुविधा मिळणार आहेत

बीआरओ कॅफे पर्यटकांना दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पार्किंग, फूड प्लाझा, रेस्टॉरंट, पुरुष, महिला आणि अपंगांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, प्रथमोपचार सुविधा, एमआय रूम इत्यादी सुविधा मिळणार आहे.

जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील या ठिकाणी बीआरओच्या कॅफे होणार सुरू

  • जम्मू-काश्मीरमध्ये बारा रस्ते विभाग निवडण्यात आले आहेत.
  • यामध्ये टीपीए, त्रागबाल, हुसेनगाव, केएम ९५, केएम ११७.९०, केएम ५८, गलहार, सियोत, बथुनी, बुधल, कपोथा आणि सुरनकोट यांचा समावेश आहे.
  • लडाखमध्ये १४ रस्ते निवडले गेले आहेत जेथे या सुविधा विकसित केल्या जातील.
  • यामध्ये मतियान, कारगिल, मुलबेक, खालत्से, लेह, हुंडर, चोगलमसर, रुम्त्से, डेब्रिंग, पांग, सरचू, अघम, न्योमा आणि हानले यांचा समावेश आहे.

 


Tags: border areasBROBRO cafesgood newsJammu And Kashmirladakhmuktpeethnew venturesTourismघडलं-बिघडलंचांगली बातमीजम्मू काश्मीरनवा उपक्रमपर्यटनबीआरओबीआरओ कॅफेमुक्तपीठलडाखसीमावर्ती भाग
Previous Post

देशात प्रथमच तीर्थस्थानी शून्य कचरा व्यवस्थापन! अमरनाथ यात्रेत स्वच्छतेचा मंत्र!!

Next Post

वाहनांच्या टायरचा रोलिंग रेझिस्टन्स, वेट ग्रिप आणि रोलिंग साऊंड एमिशन्सचा दर्जा वाढणार

Next Post
GNM 3

वाहनांच्या टायरचा रोलिंग रेझिस्टन्स, वेट ग्रिप आणि रोलिंग साऊंड एमिशन्सचा दर्जा वाढणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!