मुक्तपीठ टीम
उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील पॉक्सो न्यायालयाने चार वर्षापूर्वी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलेल्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा आणि ५२,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणात अंध पीडितीने आरोपीला आवाजाने ओळखलं होतं.
नेमकी घटना काय?
- ही घटना २२ सप्टेंबर २०१७ रोजी अमरोहा धानोरा गावात घडली.
- या पीडितीचे आई-वडिल हे शतकरी आहेत.
- एका दिवशी ती जेव्हा आपल्या नातेवाईकांच्या घरी जात होती तेव्हा आरोपीने रस्ता दाखवण्याच्या नावाखाली तिचा हात धरला आणि तिला ट्यूबवेलसाठी असलेल्या खोलीत नेले.
- तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि अंध मुलीने त्याच्या आवाजावर त्याला ओळखले.
- ती कशीबशी घरी परतली आणि पालकांना घटनेबद्दल सांगितले.
- कुटुंबाने आरोपींविरोधात आयपीसीच्या कलमांसह पॉक्सो कायदाही लावला.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवक, २० वर्षीय राहुल सिंह हा त्यांचा शेजारी आहे.
या प्रकरणाच्या निर्णयाची माहिती देताना वकील बसंत सिंह यांनी सांगितले की, गेल्या ४ वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. सर्व तथ्य लक्षात घेऊन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अवधेश सिंह यांनी सोमवारी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.