Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना योद्ध्या निवासी डॉक्टरांना शुल्क माफी आणि प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत शासन सकारात्मक

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची घोषणा

August 11, 2021
in सरकारी बातम्या
0
amit deshmukh

मुक्तपीठ टीम

गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी म्हणजेच निवासी डॉक्टर कोरोना काळात अहोरात्र काम करीत आहे. या निवासी डॉक्टरांना वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शैक्षणिक शुल्क माफी आणि प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

 

मंत्रालयात महाराष्ट्र निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटने (सेंट्रल मार्ड)च्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांची भेट घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर ढोबळे- पाटील, उपाध्यक्ष डॉ. प्रणव जाधव, जनरल सेक्रेटरी डॉ.धनराज गीते, ॲडीशनल जनरल सेक्रेटरी डॉ. अक्षय चावरे, राज्य समन्वयक डॉ. निखील कांबळे, जॉईट सेक्रेटरी डॉ. चेतनकुमार आद्रट उपस्थित होते.

 

वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख म्हणाले, गेल्या दीड वर्षापासून निवासी डॉक्टर रात्र दिवस कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी काम करीत आहे. त्यामुळे या डॉक्टरांना शैक्षणिक शुल्क माफी आणि प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत वैद्यकीय शिक्षण विभाग सकारात्मक असून याबाबत तसा प्रस्ताव तयार करण्यात येईल. वैद्यकीय संचालकांमार्फत प्रस्ताव सादर करुन वित्त विभागाला मंजुरीसाठी पाठविण्यात येईल.

 

आपल्या घरापासून दूर राहत अनेक विद्यार्थी वसतीगृहांमध्ये राहून वैद्यकीय शिक्षण घेत असतात. अशा वेळी वसतीगृहांची स्थिती चांगली असणे आवश्यक आहे. त्यामुळेच वसतीगृहांचा प्रश्न सोडविण्यासाठी वैद्यकीय शिक्षण संचालक याबाबत माहिती घेतील, असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.

 

सेंट्रल मार्ड मार्फत शैक्षणिक शुल्क माफी, कोरोना काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना देण्यात येत असलेल्या प्रोत्साहन भत्त्याप्रमाणे राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना प्रोत्साहन भत्ता देणे, वसतीगृहांमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करणे, निवासी डॉक्टरांची सुरक्षितता या मागण्यांचे निवेदन यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांना देण्यात आले.


Tags: amit deshmukhBMCcoronaShivsenaअमित देशमुखकोरोनानिवासी डॉक्टरबृहन्मुंबई महानगरपालिकामहाराष्ट्र
Previous Post

अल्पवयीन दृष्टीहीन मुलीचं साहस…केवळ आवाजावरून बलात्कारी नराधमाला ओळखून शिक्षा!

Next Post

राज्यात ५,५६० नवीन रुग्ण, ६,९४४ रुग्ण बरे होऊन घरी, विदर्भ फक्त ४४!

Next Post
MCR 4-8-21

राज्यात ५,५६० नवीन रुग्ण, ६,९४४ रुग्ण बरे होऊन घरी, विदर्भ फक्त ४४!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!