मुक्तपीठ टीम
‘प्री-ओन्ड लक्झरी कार्स’साठी ओळखल्या जाणाऱ्या ‘बॉईज अॅंड मशीन्स’ या प्रीमिअर वितरक कंपनीने चिंतन पर्यावरण संशोधन व कृती गटाच्या सहकार्याने #MakeAWish हे आपले व्हिडिओ अभियान समाज माध्यमातून सादर केले आहे. यातून या कंपनीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. त्याचा एक भाग म्हणून दहा मुलांना त्यांच्या आवडत्या आलिशान गाड्यांमधून रपेट घडवण्यात आली.
मेक अ विश…इच्छापूर्तीचा आनंद!
- ‘बॉईज अँड मशीन्स’च्या टीमने भारतातील काही लहान मुलांची स्वप्ने साकार करण्याचा निर्णय घेतला.
- स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, या टीमने ‘चिंतन पर्यावरण संशोधन व कृती गटा’तील १० किशोरवयीन मुलांना दिल्ली-एनसीआर येथील बुद्ध सर्किट येथे फेरारी गाडीची सफर घडवली.
- चिंतन ही स्वयंसेवी संस्था वंचित मुलांना उदरनिर्वाह मिळवून देते व दारिद्र्याशी लढते.
- या कार्यातून ती महिला व मुलांच्या सबलीकरणाचे काम करते.
‘किंग ऑफ पॉप’ म्हणून ओळखले जाणारे प्रख्यात गायक दलेर मेहंदी यांना कार्यक्रमाचे अतिथी म्हणून ‘बॉईज अँड मशीन्स’ने आमंत्रित केले आणि कार्यक्रमात सहभागी झालेली मुले आश्चर्यचकित झाली. मेहंदी यांना यावेळी भेटण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली. ‘बॉईज अँड मशीन्स’चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ चतुर्वेदी यांच्यासह मेहंदी यांनी या किशोरवयीन मुलांना मनोरंजनासाठी फेरारीतून फिरायला नेले. मेहंदी यांनी यावेळी मुलांच्या भविष्यातील आकांक्षा, कार्स आणि इतर अनेक विषयांवर संवाद साधला.
या उपक्रमामागील उद्देशाबाबत बोलताना, ‘बॉईज अँड मशीन्स’चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ चतुर्वेदी म्हणाले, “आम्हाला या मुलांची एक साधी इच्छा पूर्ण करून स्वातंत्र्यदिन साजरा करायचा होता. आपली एखादी लहान कृतीदेखील एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकते, यावर माझा विश्वास आहे. आपल्याला जमेल त्या पद्धतीने दुसऱ्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचा निश्चय लोकांनी करायला हवा, यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याकरीता हा उपक्रम आम्ही राबविला. या कार्यक्रमात दलेर मेहंदी यांनी उपस्थित राहून आमचा उत्साह द्विगुणित केला. त्यांची उपस्थितीने आम्हाला खूप आनंद झाला.”
दलेर मेहंदी म्हणाले, “बॉईज अँड मशीन्स’च्या या उपक्रमात सहभागी झाल्याने मला आनंद होत आहे. या मुलांसोबत एक दिवस घालवणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणे, या एकाच विचाराने मी यामध्ये जोडला गेलो. हा स्वातंत्र्यदिन त्यांच्यासोबत घालवण्याची सिद्धार्थ आणि त्यांच्या टीमची कृती खरोखरच उदात्त आहे. मी या मुलांसाठी यश चिंतितो आणि त्यांच्या आकांक्षा पूर्ण होवोत, अशा शुभेच्छा देतो.”
मोटरस्पोर्टमधील जाणकार, ‘टाइम्स अॅवॉर्ड’चे ज्युरी सदस्य आणि सुपरबाइकविषयक सल्लागार इकजोत सिंग भसीन हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते. ते लहान मुलांसह कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी आले. त्यांनी मुलांना मोटर स्पोर्ट्समध्ये लहानपणापासूनच भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले.
‘बॉईज अँड मशीन्स’ची स्थापना २०२० मध्ये झाली. सध्या मुंबई, दिल्ली एनसीआर, हैदराबाद आणि कोलकाता येथे ही कंपनी काम करते. ही कंपनी केवळ लक्झरी कार्स खरेदी करते आणि त्यांची विक्री करते. तिच्या पोर्टफोलिओमध्ये फेरारी, बेंटले, पोर्शे, मर्सिडीज, ऑडी, लेम्बोर्गिनी आणि बीएमडब्ल्यू यांसारख्या सर्वाधिक मागणी असलेल्या काही ब्रँड्सच्या गाड्यांचा समावेश आहे.
‘प्री-ओन्ड स्पोर्ट्स कार’ना मागणी सध्या वाढत असल्याने, ही कंपनी मुंबई व नवी दिल्ली येथील पारंपरिक बाजारपेठेपलीकडे जाऊन संपूर्ण देशात आपला व्यवसाय वाढविण्यावर लक्ष केंद्रित करीत आहे. २०२१च्या अखेरपर्यंत आपले नेटवर्क आठ शहरांमध्ये विस्तारित करण्याचे तिचे उद्दिष्ट आहे.