मुक्तपीठ टीम
विमान प्रवासाची तयारी करत असाल तर, एक चांगली बातमी आहे. स्वस्तात हवाई प्रवास करण्याची उत्तम संधी आहे. या योजनेमुळे १ हजार ४९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत हवाई तिकीटे बुक करता येणार आहे. #PayDaySale असे या योजनेचे नाव आहे. एअर एशिया इंडियाने आपला ‘पे डे सेल’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. या सेल अंतर्गत १ हजार ४९९ रुपयांमध्ये हवाई प्रवास करता येईल.
यापूर्वी, फ्लाइट ऑपरेटरने ७ ते १० जुलै दरम्यान बुक केलेल्या तिकिटांसाठी निवडक देशांतर्गत मार्गांवर १ हजार ४९७ रुपयांपासून भाड्यांसह ‘स्प्लॅश सेल’ जाहीर केला होता.
तिकीट रिझर्वेशन करण्यााची ३१ जुलैपर्यंतची शेवटची मुदत
- एअर एशिया इंडियाची ही विक्री २८ जुलै ते ३१ जुलै यामध्ये केलेल्या बुकिंगसाठी वैध आहे. बुकींगसाठी फक्त दोन दिवस बाकी आहेत.
- या योजनेअंतर्गत तिकीट बुकिंगवर १५ ऑगस्ट ते ३१ डिसेंबरपर्यंत प्रवास करू शकता.
- ही ऑफर मर्यादित इन्व्हेंटरी ऑफर आहे.
- विमान कंपनीच्या मते, या योजनेअंतर्गत ठराविक मार्गावर वाटप केलेल्या जागा विकल्यानंतर नियमित किंमती लागू होतील.
कंपनीने ट्विट करून त्याची माहिती देत म्हटले आहे की, एअर एशिया इंडियाच्या #PayDaySale अंतर्गत, १ हजार ४९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत हवाई प्रवासाचा आनंद घेऊ शकता. यासाठी http://airasia.co.in वर जावे लागेल.