मुक्तपीठ टीम
BMW Motorrad Indiaच्या BMW G310 RR या नवीन मोटरसायकलसाठी प्री-ऑर्डरही सुरू झाल्या आहेत. BMW आणि TVS ही ऑटोमोबाइल क्षेत्रातील दोन मोठी नावे २०१३मध्ये एकत्र आली. त्यामागे जागतिक स्तरावर ५०० cc पेक्षा कमी इंजिन असलेल्या मोटारसायकली तयार करण्याचा उद्देश ठरवला गेला. या जॉइंट व्हेंचरने यापूर्वी तीन बाईक लॉंच केल्या आहेत. BMW G310 R, BMW G310 GS, TVS Apache RR310 या बाइक भारतात चांगला प्रतिसाद मिळवतील अशी अपेक्षा आहे.
नव्या बाइकचा टिझर लाँच
- लाँच केलेल्या टीझरमध्ये नवीन BMW G 310 RR सोबत अलॉय व्हील डिझाइन, अपडेटेड ग्राफिक्स आणि सुधारित इंजिन केसिंग दाखवले आहे.
- यापूर्वी रिलीज झालेल्या टीझरमध्ये, हेडलाइट आणि टेल लाईट युनिट्स पूर्वीप्रमाणेच दिसत आहेत.
- ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, ड्युअल चॅनल एबीएस, स्लिपर क्लच आणि राइड बाय वायरसह ५-इंच रंगीत डिस्प्लेची अपेक्षा करणे चुकीचे ठरणार नाही.
- यात फेअरिंग युनिट डिझाइनसाठी नवीन रंग पर्याय देखील समाविष्ट आहेत.
सात सेकंदात १०० किमीचा वेग…
- पॉवरट्रेनसाठी, इंजिन पॉवर अपाचे RR310 सारखेच आहे.
- नवीन BMW 312cc सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड मोटरसह येऊ शकते.
- यात ६-स्पीड गिअरबॉक्स जोडला जाईल.
- ही मोटर Apache RR310 मध्ये ३४bhp पॉवर आणि २७.३Nm पीक टॉर्क जनरेट करते.
- BMW 310 RR चा टॉप स्पीड १६० किमी प्रतितास असेल आणि तो ७.१७ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग वाढवू शकतो.
- ट्रान्समिशनसाठी या कारमध्ये ६-स्पीड युनिट जोडण्यात येणार आहेत.
- BMW 310 RR ची किंमत २.६५ लाख रुपये आहे.