मुक्तपीठ टीम
मुंबईत गेल्या दहा दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबई मनपाने आता कठोर नियमावली लागू करण्यास सुरुवात केली आहे. यातच आता कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर रहिवासी इमारती सील करण्याच्या नियमात बदल करण्यात आला आहे. कोरोना रुग्ण आढळलेल्या इमारतीतील रहिवाशांसाठी मनपाने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करणे बंधनकारक असणार आहे.
मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना चिंतेत टाकणारी माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले जात आहेत. मुंबईतील रहिवासी इमारतीच्या एकूण क्षमतेपैकी २० टक्के नागरिक कोरोनाबाधित आढळून आल्यास संपूर्ण विंग किंवा इमारत सील करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.
इमारत सील करण्यासाठी मनपाची नियमावली
- इमारतीच्या किंवा विंगच्या एकूण क्षमतेपैकी २० टक्के रहिवारी कोरोनाबाधित आढळून आल्यास संपूर्ण इमारत किंवा विंग सील केली जाईल.
- आयसोलेट आणि होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करणे.
- रुग्णांना लक्षणं दिसून आल्यास किमान १० दिवस आयसोलेट राहणं बंधनकारक
- हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या नागरिकांनी ७ दिवस होमक्वारंटाईन व्हावं आणि ५ ते ७ दिवसांच्या आत कोरोना चाचणी करावी.
- इमारतीत कोरोना रुग्ण आढळून आल्यास रुग्ण आणि त्या कुटुंबाला अन्न, औषध तसंच दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा पाठपुरावा केला जाईल याची काळजी सोयायटीच्या कमिटीने घ्यावी.
- मनपाचे आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना इमारतीच्या कमिटीनं सहकार्य करावे.
- इमारती सीलमुक्त करण्याचा निर्णय वॉर्ड स्तरावर घेतला जाणार.
https://twitter.com/DighavkarKiran/status/1478046362268672000?s=20