मुक्तपीठ टीम
मणिपूर विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहे. मणिपूरमध्ये भाजपचीच सत्ता पुन्हा आली आहे. मणिपूरमध्ये विधानसभेच्या एकूण ६० जागा आहेत. या जागांसाठी दोन टप्प्यात २८ फेब्रुवारी आणि ५ मार्च रोजी मतदान पार पडलं. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह हे १८ हजार २७१ मतांनी विजयी झाले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांत भाजप २८ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ९, एनपीपी ९ आणि इतर ८ जागांवर आघाडीवर आहेत.
Shri @thsatyasingh accorded a warm welcome at Thambal Shanglen by State President Smt @AShardaDevi and party leaders.
Congratulations Shri @thsatyasingh on winning the Yaiskul AC sit for BJP. pic.twitter.com/iGcxAFSN7i
— BJP Manipur (@BJP4Manipur) March 10, 2022
२०१७ मध्ये काँग्रेस होता सर्वात मोठा पक्ष
२०१७ च्या निवडणुकीत २८ जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. मात्र भाजपाने काँग्रेच्या काही आमदारांमध्ये फूट पाडून आपल्या सोबत घेतले आणि सत्ता स्थापन केली.
मणिपूर विधानसभा निवडणूक २०२२ ची मतमोजणी सकाळी ८वाजता सुरू झाली आहे. २६५ अमेदवार निवणुकीच्या आऱ्याखड्यात उतरले होते. विद्यमान मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी भाजपा ईशान्येकडील राज्यात सलग दुसऱ्यांदा निवडून आली आहे, राज्य सोमवारी झालेल्या एक्झिट पोलमध्ये वाढलेल्या मतांसह भाजपला स्पष्ट विजय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी २०२२ मध्ये दोन टप्प्यात मतदान झाले – २८ फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यात ३८ जागांसाठी आणि उर्वरित ३ मार्च रोजी २२ जागांसाठी मतदान झाले. पहिल्या टप्प्यात ७८% मतदान झाले, तर ८४% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.