मुक्तपीठ टीम
भाजपाची ध्येयधोरणं बदलली, पक्षाच्या आणि नेत्यांच्या मानसिकतेत आमूलाग्र बदल झाला. जुना पक्ष राहिला नाही. यामुळे सहा महिन्यापासून व्यथित असलेले भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शिरीष गोडे यांनी थेट भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे वर्ध्यात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या जनजागरण यात्रेदरम्यान वर्धा जिल्ह्यात भाजपाला जबर धक्का बसला आहे.
काँग्रेसच्या जनजागरण यात्रेदरम्यान वर्ध्यात भाजपाला धक्का
- काँग्रेसच्या जनजागरण यात्रेदरम्यान वर्धा जिल्ह्यात भाजपाला जबर धक्का बसलाय.
- काँग्रेसच्या प्रभातफेरीनंतर सकाळीच काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांच्यासोबत भाजपा जिल्हाध्यक्ष शिरीष गोडे करंजी भोगे येथे आले.
- त्यानंतर गोडे यांनी पालकमंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
- गोडे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश करताच राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.
- काँग्रेसचे महासचिव केसी वेणूगोपाल, महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री सुनील केदार, आमदार रणजित कांबळे, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.
भाजपा जुना पक्ष राहिला नाही
- गोडे हे दोनवेळा भाजपाचे जिल्हाध्यक्ष होते.
- आताही त्यांच्याकडे भाजपाचं जिल्हाध्यक्षपद होतं. भाजपाची ध्येयधोरणं बदलली, पक्षाच्या आणि नेत्यांच्या मानसिकतेत आमूलाग्र बदल झाला.
- जुना पक्ष राहिला नाही.
- यामुळे सहा महिन्यापासून व्यथित होतो वरिष्ठांना माहिती दिली पण कारवाई केली नाही.
- जनतेविरोधी, शेतकरी विरोधी धोरण राबवली जात आहेत.
- शेतकरी विरोधी भूमिका घेतली जात आहे.
- त्याला कंटाळून राजीनामा दिला.
गोडे यांनी वेट अँड वॉच केलं
- मागील काही दिवसांपासून गोडे भाजपाच्या कार्यप्रणालीवरून अस्वस्थ होते.
- भाजपाची शेतकरी विरोधी भूमिका आणि वाढती महागाई यावरून त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती.
- त्यापार्श्वभूमीवर त्यांनी काही दिवसांपूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राजीनामाही पाठवला होता कार्यवाहीच आश्वासन मिळाल्यानतर गोडे यांनी वेट अँड वॉच केलं.
- या कालावधीत गोडे यांच मन वळवण्याचा प्रयत्न झाला.
- पण बदल दिसत नसल्याचं सांगत अखेर डॉक्टर गोडे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
गोडे यांना योग्य जबाबदारी देणार
- भाजपाने बहुजन समाज आणि संविधानाची चेष्टा करण्याचं पाप केलं आहे.
- त्यांचं हे पाप आम्ही जनतेसमोर मांडू.
- तसेच सर्वसामान्यांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात यशस्वी होऊ, असा विश्वास आहे, असं सांगतानाच गोडे यांना योग्य जबाबदारी देणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.