मुक्तपीठ टीम
दिवाळी तोंडावर असताना पुन्हा एकदा एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण करावे, या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. त्यावरुन भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास राज्य सरकार व परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले केशव उपाध्ये?
- एसटी महामंडळाच्या ३०६ कर्मचाऱ्यांचा कोरोनामध्ये मृत्यू २५ कर्मचाऱ्यांची आत्महत्या पण उद्धव ठाकरे सरकार मात्र थंड आहे.
- परिवहन मंत्री सध्या कोणत्या वसुलीत इतके गुंतलेत की, त्यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही? मुळात अनिल परब आहेत कुठे?
- त्याचबरोबर शिवसेनेत कदम विरुद्ध परब कोल्डवॉर सुरू असल्याने महाविकास आघाडीने परिवहन खातं रामभरोसे सोडलंय असं दिसतंय.
- मुख्यमंत्री एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करणार का?
- आर्यनचे पाठीराखे व ड्रग्ज विरोधी मोहीमेवर टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मलिक या प्रश्नावर बोलणार नाहीत कारण सर्वसामान्यांचा प्रश्न आहे.
शिवसेनेत कदमX परब कोल्डवॉर सुरू असल्याने महाविकासआघाडीने परिवहन खातं रामभरोसे सोडलंय असं दिसतंय. मुख्यमंत्री ST कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करणार का? आर्यनचे पाठीराखे व ड्रग्ज विरोधी मोहीमेवर टीका करणारे NCP मंत्री मलिक या प्रश्नावर बोलणार नाहीत कारण सर्वसामान्यांचा प्रश्न आहे.
— Keshav Upadhye (@keshavupadhye) October 23, 2021
एसटी कर्मचाऱ्यांची मागणी
- २७ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण सुरु होणार आहे.
- एसटीचे राज्यसरकारमध्ये विलगीकरण करावे.
- पगारवाढ त्याचबरोबर महागाई भत्त्यात वाढ मिळावी यासाठी आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली.
- आंदोलनाचा तिढा वेळी सुटला नाहीतर ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.