मुक्तपीठ टीम
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. भाजपाला साथ न देणाऱ्या एक लाख मतदान केंद्रांवर खास लक्ष करण्याचे भाजपाने ठरवले आहे. याआधीही भाजपाने ७३ हजार अशा मतदान केंद्रांवर लक्ष करुन आपला पाया मजबूत केला होता. मतदान केंद्र मजबूत करण्यासाठी भाजपाचे खासदार आणि विधानसभा सदस्यांव्यतिरिक्त पक्षाचे ४० हजारहून अधिक कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
पक्ष मजबूत करण्यासाठी ९० हजार मतदान केंद्रांना भेटी!!
- भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देशभरातील ७३ हजार असुरक्षित मतदान केंद्रावर लक्ष केंद्रित करण्यासाठी पक्षाचे उपाध्यक्ष बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली होती. आता या संख्येत वाढ झाल्याने, भाजपाने पक्ष मजबूत करण्यासाठी ९० हजार मतदान केंद्रांना भेटी दिल्या आहेत.
- मतदान केंद्र मजबूत करण्यासाठी खासदार आणि विधानसभा सदस्यांव्यतिरिक्त पक्षाचे ४० हजारहून अधिक कार्यकर्ते काम करत आहेत.
- जिथे खासदार आणि आमदार आपापल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करत आहेत.
- त्याच वेळी, एमएलसी आणि राज्यसभा सदस्यांना देखील लक्ष केंद्रित करण्यासाठी मतदारसंघ देण्यात आले आहेत.
असे केले आहे नियोजन!!
- भाजपाला साथ न देणाऱ्या जागांवर अधिक वेगाने लक्ष केंद्रित करण्यात मदत करण्यासाठी मिळालेला डेटा पक्षाच्या नेत्यांना पाठवला जाईल.
- निर्धारित लक्ष्यांवर माहिती अपलोड करण्यासाठी सतत संवाद आणि रिअल-टाइम फीडबॅकसाठी एक ऍप्लिकेशन विकसित केले गेले आहे.
- याशिवाय राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहेत.
- जेणेकरून लोकांना ग्राउंड लेव्हलवर कॉल करता येईल आणि अॅपवर अपलोड केलेल्या डेटाची पडताळणी करता येईल.
या प्रकाराची माहिती पक्षाला मिळत आहे-
- काही जागांवर स्थानिक खासदार किंवा आमदारांचा जनतेशी पुरेसा संबंध नसल्याचा अभिप्राय पक्षाला मिळाला आहे.
- काही जागांवर पक्षाला यश न मिळण्यामागे स्थानिक नेत्यांमधील मतभेद हेही एक कारण असल्याचे समोर आले आहे.
- आणखी एक आव्हान म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांची नावे.
- काही बिगर-भाजपा शासित राज्यांमध्ये केंद्र आणि राज्याच्या योजनांची नावे सारखी असल्यामुळे केंद्राद्वारे चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही फायदेशीर योजनेच्या मालकीबाबत लोकांमध्ये संभ्रम असल्याचे पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.