Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भाजपातर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती

August 18, 2021
in घडलं-बिघडलं
0
chandrakant patil

मुक्तपीठ टीम

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रच्या माध्यम विभागातर्फे ‘गेल्या ७५ वर्षात देशाने काय कमावले? काय करायचे बाकी आहे?’ या विषयावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा सर्व वयोगटातील नागरिकांसाठी खुली असून पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे पंचाहत्तर हजार, पन्नास हजार व पंचवीस हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येतील तसेच स्पर्धेतील निवडक निबंधांचे संकलन करून एक ग्रंथ प्रकाशित करण्यात येईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, आपला देश १५ ऑगस्ट २०२१ रोजी स्वातंत्र्याची ७४ वर्षे पूर्ण करून अमृत महोत्सवी ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या ७४ वर्षात देशाने अनेक क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. त्याचबरोबर करण्यासारखे बरेच काही राहून गेले आहे. अनेक संधींचा लाभ घेतला तर अनेक संधी गमावल्या. देशाची अर्थव्यवस्था, शेती, सिंचन, शिक्षण, संरक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, सामाजिक सुधारणा अशा अनेक बाबतीत देशाची प्रगती झाली आहे पण त्याचबरोबर अनेक कामे करणे अद्यापही बाकी आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या सर्वाचा आढावा घेण्याची वेळ आली आहे. देशासंबंधीच्या महत्त्वाच्या विषयावर अमृतमंथन घडविण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे.

त्यांनी सांगितले की, स्पर्धेसाठीचे निबंध चार हजार ते पाच हजार शब्दांचे असावेत, त्यामधील नोंदींच्या संदर्भांचा स्पष्ट उल्लेख असावा आणि निबंध संशोधनपर असावेत अशी अपेक्षा आहे. या निबंध स्पर्धेच्या निमित्ताने राज्यातील नागरिकांनी विविध विषयांवर व्यापक वाचन करावे आणि काही निश्चित विश्लेषणात्मक भूमिकेतून लेखन करावे, अशी अपेक्षा आहे.

 

स्पर्धेसाठीचे निबंध bjpessaycompetition@gmail.com या २५ नोव्हेंबरपर्यंत ई मेलने पाठवावेत. विविध क्षेत्राशी संबंधित २५ विषयांची यादी निश्चित केली असून त्या पैकी कोणत्याही एका विषयावर मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या भाषेत निबंध लिहावा. प्रत्येक भाषेसाठी स्वतंत्रपणे पारितोषिकांची व्यवस्था केली आहे. विषयांची यादी आणि स्पर्धेची नियमावली प्रदेश भाजपाच्या मनोगत या ॲपवर उपलब्ध आहे. गुगल प्लेस्टोअरवरून हे ॲप डाऊनलोड करून घेता येईल. हे ॲप https://bit.ly/3fhfYRp या लिंकवरही उपलब्ध आहे.

 


Tags: BJPchandrakant patilभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलभाजपा
Previous Post

फोन मॉनिटरिंगची केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती, पण सॉफ्टवेअर उघड करण्यास नकार!

Next Post

केंद्र सरकारमुळे मराठवाड्यातील पायाभूत सुविधांचा झपाट्याने विकास

Next Post
bhagwat karad

केंद्र सरकारमुळे मराठवाड्यातील पायाभूत सुविधांचा झपाट्याने विकास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!