मुक्तपीठ टीम
उत्तर प्रदेशमध्ये दोन टप्प्यांचे मतदान पार पडले. यावेळी उत्तरप्रदेशात सत्तापालट होणार का यासाठीच आता तिसर्या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा स्थितीत वादग्रस्त विधानांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातही भाजपाचे आमदार टी राजा सिंह यांनी व्हिडीओद्वारे जारी केलेले वक्तव्य हे मतदारांना धमकावण्याचा प्रकार असल्याची टीका होत आहे. “जे मतदार भाजपाला मत देणार नाहीत त्यांच्यासाठी योगींनी हजारो बुलडोझर मागवलेत!” असं ते म्हणालेत.
टी राजा सिंह हे हैदराबादच्या गोशामहर विधानसभा मतदारसंगातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात ते म्हणत आहेत की, आज यूपीमध्ये दुसऱ्या टप्प्याचे मतदान झाले आहे. काही भागात खूप मतदान झाले, ज्यांना योगीजी आवडत नाहीत त्यांनी मोठ्या संख्येने बाहेर येऊन मतदान केले. खरंतर हेच बोलणं मुस्लिमविरोधी मानले जाते. पण त्याला कायदेशीर आक्षेप घेता येणार नाही.
विरोधात मतदान करणाऱ्यांसाठी बुलडोझर निघालेत…
- आमदार टी राजा इथेच थांबला नाही.
- ते पुढे म्हणाले, “जे भाजपला मत देत नाहीत, त्यांना मी सांगेन की योगी यांनी हजारो जेसीबी आणि बुलडोझर मागवले आहेत.
- ते सर्व यूपीकडे निघाले आहेत.
- निवडणुकीनंतर असे विभाग शोधले जातील जिथून योगीजींना पाठिंबा दिला नाही.
यूपीत राहायचे असेल तर योगी-योगी म्हणावे लागणार!
- भाजपा आमदार टी. राजा यांनी तिसऱ्या टप्प्यात भरघोस मतदान करून भाजपाला विजयी करण्याचे आवाहन हिंदूंना केले.
- उत्तर प्रदेशात राहायचे असेल तर योगी-योगी म्हणावे लागेल, नाहीतर यूपी सोडून पळून जावे लागेल.