मुक्तपीठ टीम
सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणी लखबीर सिंग या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. अमानुष हत्या करुन त्या तरुणाचा मृतदेह पोलिसांच्या बॅरिकेटवर लटकवण्यात आला होता. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली असताना आता या प्रकरणाला वेगळं वळण आलं आहे. काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर सिंह सिंघू सीमेवर बसलेल्या निहंग जथेबंदींच्या प्रमुखांपैकी एक असलेल्या बाबा अमन सिंह यांचा सिरोपा घालून सन्मान करत आहेत. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी आणि इतर भाजपा नेतेही फोटोमध्ये दिसत आहेत. त्यामुळे आता भाजपाच्या आक्रमक भूमिकेमुळे बचावात्मक पावित्र्यात गेलेले शेतकरी नेते आक्रमक झाले आहेत.
‘Baba Aman Singh is head of the Nihang group that killed a man at the Singhu border. 4 Nihangs of this group have been arrested. He has been spotted in photos with national BJP leaders, including Union Agriculture Minister NS Tomar’
Important report 👇https://t.co/0hiIrgisOa— Neha Dixit (@nehadixit123) October 19, 2021
शेतकरी नेत्यांचा हत्येमागे कट असल्याचा आरोप
- फोटो समोर आल्यानंतर संयुक्त किसान मोर्चाने लखबीर सिंग यांच्या हत्येमागे कट असल्याचे सांगत भाजपवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
- भाजपा नेत्यांसोबत निहंग बाबा अमन सिंह यांचे ३ फोटो समोर आले आहेत.
- हे फोटो जुलै २०२१ मधील आहेत.
- केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्या घरी काढलेल्या या फोटोंमध्ये बाबा अमन सिंहसह अनेक भाजपाननेते दिसत आहेत.
- त्यात केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर,कैलाश चौधरी, लुधियानाचे भाजपा किसान सेलचे राष्ट्रीय सचिव सुखमिंदरपाल सिंह ग्रेवाल,पंजाब पोलिसातून काढून टाकण्यात आलेले इन्स्पेक्टर गुरमीत सिंग ‘पिंकी’ आणि इतर काही जण दिसत आहेत.
- एका फोटोमध्ये नरेंद्र सिंह तोमर यांनी बाबा अमन सिंग यांना सिरोपा घातला आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये बाबा अमन सिंह केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्यांसोबत जेवणाच्या टेबलावर बसून जेवत आहेत.
Union Agriculture Minister NS Tomar with head of a Nihang sect in possible efforts to negotiate end of farmers’ stir, says this news report.
What is pretty interesting is the presence of murder convict Gurmeet Singh ‘Pinky’, an informer turned cop who was dismissed from service. pic.twitter.com/bqzDX14pXd— Man Aman Singh Chhina (@manaman_chhina) October 19, 2021
किसान मोर्चाने फोटो ट्वीट केला
- मंगळवारी संयुक्त किसान मोर्चाने केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि निहंग बाबा अमन सिंह यांचे फोटो ट्वीट केले.
- उल्लेखनीय आहे की सिंघू सीमेवर लखबीर सिंहच्या हत्येच्या आरोपावर ज्या चार निहंगा सरबजीत सिंह, नारायण सिंह, भगवंत सिंग आणि गोविंदप्रीतने शरणागती केले, ते चारही बाबा अमन सिंग सोबतचे आहेत.
- सरबजीत सिंह, भगवंत सिंग आणि गोविंदप्रीत यांच्या शरणागती दरम्यान बाबा अमन सिंह स्वतः पुढे होते.