Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

किरीट सोमय्यांनी पत्रकारांना हाकललं! मोठ्या नेत्यांचा ‘मुंबईतील पत्रकार, ग्रामीण पत्रकार’ भेदभाव उघड! माध्यमांचाही!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Kirit Somaiyya

एस. एम. देशमुख

पत्रकारांमध्ये मुंबईचा मीडिया आणि ग्रामीण मीडिया असा भेद करून पत्रकारांमध्ये वाद निर्माण करण्याचा, फूट पाडण्याचा राजकारणी कायम प्रयत्न करीत असतात. आजही महाडमध्ये हेच चित्र दिसले. भाजपानेते किरीट सोमय्या सध्या कोकण दौरयावर आहेत. ते महाड येथे आले असता अगोदर मुंबईच्या मिडियाला घेऊन ते हॉटेलात गेले. तेथे उपस्थित असलेल्या स्थानिक पत्रकारांवर डाफरत त्यांनी त्यांना बाहेर काढून अपमानास्पद वागणूक दिली. या घटनेचा रायगड प्रेस क्लबने निषेध केला आहे. पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने देखील घटनेचा निषेध केला आहे.

 

मुळात मीडिया आता मोठ्या प्रमाणावर विस्तारला आहे. मोठी वृत्तपत्रे, चॅनल्सचे प्रतिनिधी प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात कार्यरत आहेत. ही मुलं चांगली शिकलेली, उत्तम बातमीदार आहेत. स्थानिक पातळीवरील बातम्या ही पत्रकार मंडळी आपआपल्या माध्यमांना सातत्याने पाठवत असतात. त्या छापल्या देखील जातात. मग किरिट सोमय्या सारखे नेते जेव्हा ग्रामीण भागात येतात तेव्हा त्यांना मुंबईतील मिडियाचा ताफा का लागतो? माध्यम समुहांनी देखील आपल्या स्थानिक पत्रकारांवर अविश्वास दाखवत मुंबईतील पत्रकारांना का नेत्यांबरोबर पाठवावे? यातून मुंबईतील मीडिया आमच्याबरोबर आहे, स्थानिक पत्रकारांची गरज काय अशी घमेंड या नेत्यांमध्ये निर्माण होते आणि ते स्थानिक पत्रकारांवर अरेरावी करीत राहतात.

 

अशा घटना सातत्याने घडत असतात. मुंबईतील प्रतिनिधी जेव्हा येतात तेव्हा ते सारी माहिती स्थानिक पत्रकारांकडूनच घेतात आणि सवत:च्या नावाने रिपोर्ट तयार करतात. असे असले तरी आज महाडमध्ये जे घडले त्याबाबत ताफ्यातील पत्रकारांच्या प्रतिक्रिया थंड होत्या.. महाडच्या पत्रकारांना बाहेर काढल्यानंतर ताफ्यात असलेल्या मुंबईतील एका ही पत्रकाराने त्याला विरोध केला नाही, असे समजते. हे योग्य नाही. पत्रकार खेड्यातले असले तरी ते आपले सहकारी आहेत असे आमच्या मुंबईकर मित्रांना का वाटत नाही? फोडा आणि झोडाच्या या कटाला आपण बळी का पडतो?

 

महाडमधील घटनेबद्दल भाजपने जाहीरपणे माफी मागेपर्यंत भाजपच्या स्थानिक बातम्यांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय रायगड प्रेस क्लब आणि स्थानिक पत्रकारांनी घेतला पाहिजे त्या शिवाय ही मस्ती संपणार नाही. कठोर भूमिका घेतली गेली नाही तर अशा घटना वारंवार घडत राहतील आणि वांझोटे निषेध करीत बसण्यापेक्षा वेगळे काही आपल्या हाती राहणार नाही.

 

(एस. एम. देशमुख हे ज्येष्ठ पत्रकार, संपादक आहेत. ते पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पत्रकारांच्या हक्कांसाठी लढणारे अग्रगण्य लढवय्ये आहेत.)


Tags: journalistsKirit somaiyyamumbaiReporterS.M Deshmukhकिरीट सोमय्यापत्रकार
Previous Post

#मुक्तपीठ LiVE पंतप्रधान नरेंद्र मोदींची राष्ट्रासोबत मन की बात, २७ मार्च २०२२

Next Post

शिवसेना आमदाराचा राष्ट्रवादीच्या नेत्यावर छळाचा आरोप…थेट ठाकरे-पवारांकडे तक्रार करणार!

Next Post
patil-khadse

शिवसेना आमदाराचा राष्ट्रवादीच्या नेत्यावर छळाचा आरोप...थेट ठाकरे-पवारांकडे तक्रार करणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!