मुक्तपीठ टीम
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. मुक्तपीठच्या पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसानंतर काही महिन्यातच काही महत्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे आपल्या नेत्याचा वाढदिवस अतिभव्य पद्धतीने साजरा करण्यासाठी भाजपाने जबरदस्त तयारी केली आहे. ७१ व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगभरातून आणि सर्व क्षेत्रातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Heartiest Birthday Greetings to our inspiration, a great visionary, most popular, loved leader Hon PM Shri @narendramodi ji !
Wishing him a long life & good health !
We all are blessed to have his strong & decisive leadership in these difficult times. #HappyBdayModiji pic.twitter.com/J9yxmBbIYO— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 17, 2021
पंतप्रधानांचा वाढदिवस, साजरा होणार दणक्यात!
- केवळ एक दिवसापुरते नाही तर पुढील २१ दिवस भाजपाने देशभरात कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
- त्याला सेवा आणि समर्पण मोहीम असे नाव देण्यात आले आहे.
- या मोहिमेचे समापन ७ ऑक्टोबर रोजी होईल.
- या विशेष प्रसंगी पार्टी हायकमांडने कॅडरला एकाच दिवशी दीड कोटी लस देण्याचे, आरोग्य आणि रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे, गरिबांना रेशन वाटप करण्याचे आणि भेटवस्तू आणि स्मृतीचिन्हांचे ई-लिलाव करण्याचे निर्देश दिले आहेत.
- पंतप्रधान मोदींच्या राजकीय प्रवासाला २० वर्षे पूर्ण झाल्यावर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा एका छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटनही करतील.
- पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त लसीकरणाचा विक्रम करण्याचेही नियोजन आहे.
- त्यासाठी दीड कोटी लोकांचे लसीकरण करण्याची प्रयत्न असणार आहे.
- त्याचबरोबर मोदींनी सत्तेत दोन दशके पूर्ण केल्याचा आनंद पंतप्रधानांच्या सार्वजनिक कार्यालयात साजरा केला जाईल.
- मोदी १३ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री आणि गेली सात वर्षे पंतप्रधान होते.
- देशात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरेही आयोजित केली जातील.
Warm birthday greetings to our honourable PM @narendramodi ji. May you be blessed with good health and happiness.
— Virat Kohli (@imVkohli) September 17, 2021
कैलास विजयवर्गीयांवर इव्हेंट मॅनेजमेंटची जबाबदारी!
- सेवा आणि समर्पण मोहिमेसाठी भाजपने चार सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.
- जेणेकरून प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांसाठी कार्यक्रम आयोजित करता येतील. या समितीचे अध्यक्ष कैलास विजयवर्गीय आहेत.
Warm Birthday Wishes to Prime Minister Shri. Narendra Modi Ji.
I wish him good health and happiness.@narendramodi @PMOIndia— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 17, 2021
मोदींच्या वाराणसी मतदारसंघात ७१ कार्यक्रम!
- पंतप्रधानांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त वाराणसीमध्ये १७ ते २१ सप्टेंबर दरम्यान ७१ कार्यक्रम होतील.
- तसेच सकाळी १० वाजता अस्सी घाटावर माँ गंगाला ७१ मीटर लांब चुनारी अर्पण करण्याचा कार्यक्रम असेल.
- सर्व विधानसभांमध्ये ७१ किलो लाडू वितरित करण्याची योजना आहे.
- जिल्हा आणि महानगरातील प्रत्येक घरात दिवा लावण्याचा आणि ७१ प्रमुख मंदिरांमध्ये आरती आणि दीपोत्सव करण्याचा कार्यक्रमही असेल.