Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“बार्टीला निधी कमी पडू दिला जाणार नाही ही वल्गना!”

भाजपाच्या अमित गोरखेंची आघाडी सरकारवर टीका

September 17, 2021
in घडलं-बिघडलं
0
bjp-mva

मुक्तपीठ टीम

राज्यभरात रोष निर्माण झाल्या नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ला अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या ३०० कोटी पैकी केवळ ९१.५० कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला असून, बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी खोटी घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे केली असली तरी सहा महिने होऊन देखील केली गेलेली अल्प तरतूद ही आघाडी सरकारची अनास्था स्पष्ट करीत असून मी याचा तीव्र निषेध व्यक्त करीत आहे. अत्यल्प निधी मंजूर करणाऱ्या अर्थ विभाग व सामाजिक न्याय मंत्र्यांची भूमिका अनुसूचित जाती विरोधात असल्याचा माझा स्पष्ट आरोप ठाकरे सरकार वर आहे.

 

बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रम व कार्यशाळा आदींसाठी ९० कोटी रुपये तसेच महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक देखभाल समिती साठी दीड कोटी असे एकूण ९१.५० कोटी रुपये आज स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात आले आहेत.

 

गेली सहा महिने बार्टीच्या योजनांची केली जाणारी दुरावस्था पाहता अनुसूचित जाती मध्ये तसेच समाज माध्यमांमध्ये बार्टीच्या योजना बंद पडणार अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत, बार्टीची प्रत्येक योजना तळागाळातील अनुसूचित जाती घटकांतील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आहे. यांपैकी कोणतीही योजना बंद पडणार नाही, यांची काळजी ठाकरे सरकारने घेणे गरजेचे आहे.

 

सरकारने केलेली अल्प तरतूद अनुसूचित जातीच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. सरकारने जाणिवपूर्वक गेली सहा महिने निधी मंजूर करण्यात चालढकल केली आहे. सामाजिक न्यायमंत्री त्यांच्याच “घरातील” मालिकेत अडकुन पडल्याने त्यांची धडपड स्वतःचे मंत्रिपद वाचविण्यासाठी सुरू आहे. आघाडी सरकारने आरक्षित वर्गाच्या पदोन्नती मध्ये आरक्षण नाकारले, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सा अण्णाभाऊ साठे महामंडळाला १०० कोटी ची घोषणा विधिमंडळात केली परंतु ती अजूनही कागदावरच आहे, ह्या ठाकरे सरकारने आपला डाव अनुसूचित जातीच्या योजना बंद करून त्यातील तरतूद इतरत्र वळविण्यासाठी टाकला आहे असे दिसते.

 

तरी अनुसूचीत जाती साठी चा सर्व निधी ,सर्व महामंडळाचा निधी या सरकारने ताबडतोब द्यावा नाहीतर राज्यभर याचे पडसाद उमटतील, असा इशारा भाजपा प्रदेश मंत्री व सा अण्णा भाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी प्रसिध्दी पत्रका द्वारे दिला आहे.


Tags: bartiDhananjay Mundeआघाडी सरकारडॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थाधनंजय मुंडेबार्टी
Previous Post

“युवक काँग्रेस आज ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ पाळणार!”: सत्यजित तांबे

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७१वा वाढदिवस! ७१ कार्यक्रम!! २१ दिवस कार्यक्रमांची रेलचेल!!!

Next Post
मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७१वा वाढदिवस! ७१ कार्यक्रम!! २१ दिवस कार्यक्रमांची रेलचेल!!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!