Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंढरपूरच्या विजयानंतर भाजपाच्या खोचक प्रतिक्रिया…”आवताडेंचा विजय आघाडीच्या थोबाडात मारल्यासारखा!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bjp

मुक्तपीठ टीम

बंगालमधील महाविजय आणि तामिळनाडूमधील विजयाबद्दल ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांचे कौतुक करतानाच राज्यातील आघाडीच्या नेत्यांना एक बोच असेल ती पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाची. त्या पोटनिवडणुकीचाही आज निकाल जाहीर झाला. भाजपाच्या समाधान आवताडेंनी ७५०० मतांनी राष्ट्रवादीच्या ताब्यातील ही जागा हिरावून घेतली आहे. स्वाभाविकच भाजपाच्या नेत्यांनी राज्यातील आघाडी सरकारवर खोचक टीका करण्यास केली आहे.

 

“फडणवीस जे बोलतात ते करुन दाखवतात!” – चंद्रकांत पाटील

  • भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर कठोर शब्दांत टीका केली. समाधान आवताडे याचा विजय हा महाविकास आघाडीला थोबाडीत मारल्यासारखं आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
  • तसेच पुढे बोलताना त्यांनी पाच राज्यांच्या निकालानंतर देशात काँग्रेस पक्ष शून्य आणि अस्तित्वहीन झाला आहे, अशी टीका केली.
  • यावेळी पुढे बोलताना त्यांनी भाजप यानंतरच्या सर्व निवडणुकीत संघटनात्मक पद्धतीने काम करणार असे सांगितले.
  • “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जे बोलतात ते करून दाखवतात, असे चंद्रकांत पाटील म्हणालेत.

 

“साम, दाम, दंड, भेद, सगळं करूनही जनतेने आघाडीला नाकारलं” – केशव उपाध्ये

भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकासआघाडीवर थेट निशाणा साधला आहे.

”महाविकास आघाडीची पूर्ण ताकद पणाला लावली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार ठाणं मांडून बसलेले, टप्प्यात आल की गेम करण्याची भाषा करणारे जयंत पाटील यांचे दौरे, नाना पटोले यांची सभा, प्रशासनाचा फौजफाटा साम, दाम, दंड, भेद, सगळ करूनही जनतेने नाकारले. पंढरपूरात भाजपाचा आमदार हा राज्य सरकारविरोधातील जनतेचा कौलच” असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

 

“सांगा कुणी केला करेक्ट कार्यक्रम?” गोपीचंद पडळकर

भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आघाडीवर टीका केली आहे. “पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही.. सांगा आता कुणी केला करेक्ट कार्यक्रम?”, असा खोचक प्रश्न त्यांनी विचारला आहे.

आमदार समाधान आवताडेंचं सात हजार मतांनी दणदणीत विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदनही केले आहे.

 

पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही.. सांगा आता कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम?’

नुतन आमदार समाधान आवताडेंचं सात हजार मतांनी दणदणीत विजय झाल्याबद्दल हार्दीक अभिनंदन.

जय मल्हार.@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis
Prashant Paricharak – प्रशांत परिचारक @SamadhanAutade pic.twitter.com/kWXKR4wFXC

— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) May 2, 2021

 

मलिकांनी सरळ दादांचा राजीनामा मागावा ना…- अतुल भातखळकर

भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची खिल्ली उडवली आहे.
“प.बंगालमधील मतदारांनी नाकारल्यामुळे गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा- नवाब मलिक” असे विधान देत भातखळकरांनी “अहो, नवाब मलिक अजित दादांचा राजीनामा मागायचाय तर सरळसरळ मागा. हे द्राविडी प्राणायम कशाला?” असा खोचक सवाल केला आहे.

 

प.बंगालमधील मतदारांनी नाकारल्यामुळे गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा- नवाब मलिक

अहो, नवाब मलिक अजित दादांचा राजीनामा मागायचाय तर सरळसरळ मागा. हे द्राविडी प्राणायम कशाला?😀

— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 2, 2021


Tags: BJP MLA Atul Bhatkhalkharchandrakant patildevendra fadanvisgopichand padalkarMVAPandharpur - Mangalvedhasamadhan awtadeअजित पवारअतुल भातखळकरकेशव उपाध्येगृहमंत्री अमित शाहगोपीचंद पडळकरचंद्रकांत पाटीलदेवेंद्र फडणवीसनवाब मलिकममता बॅनर्जीमहाविकास आघाडीसमाधान आवताडे
Previous Post

“पुणे मनपाला जमते ते तुम्हाला का जमत नाही, झोपा काढत होता का?”

Next Post

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत ६४ जागांसाठी भरती

Next Post
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत ६४ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!