मुक्तपीठ टीम
भाजपाकडून विधान परिषदेसाठी पाच उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात सध्याचे विप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, महिला भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे, राज्य सरचिटणीस श्रीकांत भारतीय, प्रसाद लाड यांचा समावेश करण्यात आला आहे.
खूपच अपेक्षा ठेवून असलेल्या पंकजा मुंडेंऐवजी उमाताई खापरेंची निवड धक्कादायक मानली जात आहे. शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांची निवड करताना अटतटीच्या लढाईत आवश्यक ते बळ पुरवण्याची क्षमता लक्षात घेण्यात आल्याचं मानलं जातं.
भाजपाने जाहीर केलेले उमेदवार
- प्रवीण दरेकर
- प्रा. राम शिंदे
- श्रीकांत भारतीय
- उमाताई खापरे
- प्रसाद लाड
विधान परिषद निवडणूक कार्यक्रम
- अधिसूचना २ जून २०२२
- उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस – ९ जून २०२२
- अर्जांची छाननी – १० जून २०२२
- अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस – १३ जून २०२२
- मतदानाचा दिवस – २० जून २०२२
- मतदानाची वेळ – सकाळी ९ ते सायंकाळी ४
- मतमोजणीचा दिवस – २० जून २०२२ (सायंकाळी ५ वाजता)