मुक्तपीठ टीम
केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीमध्ये भाजपाप्रणीत एनडीएच्या पारड्यात मतदारांनी कौल दिला आहे. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. काँग्रेस आणि भाजप-एआयएनआरसी-एआयएडीएमके युती यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली. विजयाचा झेंडा फडकावण्यासाठी भाजपने आखिल भारतीय एनआर काँग्रेस आणि एआयडीएमके यांच्यासह युती केली होती. भाजपची ही रणनिती यशस्वी झाल्याचं दिसत आहे.
पद्दुचेरी विधानसभा निकाल – ताजे कल
- बहुमताचा आकडा – १६
- भाजपा आघाडी – १६
- काँग्रेस डीएमके आघाडी – ८
- इतर – ६
- एकूण जागा – ३०
पद्दुचेरीत एक्झिट पोलचे अंदाज काय होते?
- रिपब्लिक टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला १६ ते २० जागा, काँग्रेस आघाडीला ११ ते १३ जागा मिळू शकतात.
- एबीपी सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला १९ ते २३ जागा, काँग्रेस आघाडीला ६ ते १० जागा मिळू शकतात.
पुद्दुचेरीसाठी एक्झिट पोलचे काय होते अंदाज?
• पुद्दुचेरीत एकाच टप्प्यात मतदान झाले होते
८१.६४ टक्के मतदान झाले होते.
• पुद्दुचेरी विधानसभा निवडणूकीच्या एक्झिट पोलमध्ये भाजपा आघाडीचा विजय होणार असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
• इंडिया टूडे-माय एक्सिस इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजपा आघाडीला २०-२४ जागा, काँग्रेस आघाडीला ६-१० जागा
• एबीपी सी-वोटरच्या एक्झिट पोलनुसार भाजपा आघाडीला १९-२४ जागा, काँग्रेस आघाडीला ६-१० जागा आणि इतर १-२ जागा
• रिपब्लिक- सीएनएक्सच्या एक्झिट पोलनुसार भाजपा आघाडीला १६-२० जागा, काँग्रेस आघाडीला ११-१३ जागा
• टीव्ही ९ पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार भाजपा आघाडीला १७-१९ जागा, काँग्रेस आघाडीला ११-१३ जागा