मुक्तपीठ टीम
मुंबई मनपाची निवडणूक जवळ येवू लागली आहे तशी मुंबईतही भाजपा हिंदुत्वाच्या मु्द्द्यावर आक्रमक होताना दिसत आहे. भाजपा नेते मोहित कंबोज यांनी मशिदींवरील लाऊडस्पीकर्सबद्दल आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता हिंदू सणांच्या मुद्द्यावर भाजपा आक्रमक झाली आहे. भाजपा नेते आमदार आशिष शेलारांच्या गुढी पाडवा – राम नवमी मिरवणुकींना परवानगी देण्याच्या मागणीला अद्यार प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे संतापलेल्या आशिष शेलारांनी “हिंदू सणांना परवानगी देण्याचा विषय आला की, ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो?” असा प्रश्न विचारला आहे.
त्यावेळी ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो?
- ठाकरे सरकारने गुढीपाडव्या शोभायात्रा आणि रामनवमीच्या मिरवणुकांना परवानगी देण्याची स्पष्ट भूमिका आजपर्यंत घेतली नाही.
- त्यामुळे संभ्रमाचे वातावरण कायम आहे.
- ज्या ज्या वेळी हिंदू सणंचा विषय येतो, त्यावेळी ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो?
- मुंबई पोलिसांनी मुंबईत १० मार्च ते ८ एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले आहेत.
- आतंकवादी, देशविरोधी शक्ती या ड्रोन, रिमोट कंट्रोलचा वापर करून हल्ला करतील असं कारण त्यासाठी देण्यात आले आहे.
- पोलिसांकडे तशी माहिती आली असेल तर त्याबाबत सुरक्षा यंत्रणांनी खबरदारी जरूर घ्यावी.
- मात्र, या काळात गुढीपाडवा आणि राम नवमीचे कार्यक्रम आहेत, याचाही विचार राज्य सरकारने करायला हवा.
कायदेशीर प्रक्रियेचंपालन करून या सणांना परवानग्या द्या!
- हिंदू सणांचा विषय आला की सरकारच्या हाताला लकवा का मारतो?
- आणि रामभक्तांचा विषय आला की शिवसेनेची भूमिका बोटचेपी का असते?
- ‘कायदेशीर प्रक्रियेचं संपूर्ण पालन करून या दोन्ही सणांना परवानग्या देण्यात याव्यात.
- या कार्यक्रमात सरकारनं खोडा टाकू नये.
- आम्ही मंडळ व समित्यांसोबत चर्चा करीत असून या उत्सवात भारतीय जनता पक्ष सहभागी होईल