मुक्तपीठ टीम
बिहारमधील एका विद्यार्थिनीने सॅनिटरी पॅड मोफत उपलब्ध करुन देण्याच्या मागणीवर बिहारच्या एका वरिष्ठ महिला आयएएस अधिकाऱ्याने किळसवाणं उत्तर दिले आहे. ‘आज तुम्ही सॅनिटरी पॅड मागत आहात, उद्या कंडोम मागाल’! एवढंच नाही तर मत देत असल्यानं मागत असाल तर पाकिस्तानात जा, असंही त्या बोलल्याने सर्वांनाच धक्का बसला.
सरकार मोफत सॅनिटरी पॅड देऊ शकत नाहीत का?
- राजधानी पाटणामध्ये महिला आणि बाल विकास महामंडळ, युनिसेफ, सेव्ह द चिल्ड्रन आणि प्लान इंटरनॅशनल यांनी ‘सशक्त बेटी, समृद्धी बिहार: टुवर्ड्स एन्हान्सिंग द वैल्यू ऑफ गर्ल चाइल्ड’ या थीमवर एक कार्यक्रम आयोजित केला होता.
- बिहारमधील मुली आणि महिलांशी संबंधित समस्या आणि त्यांच्यासाठी सुरू असलेल्या कामांबद्दल मुलींना माहिती देणे आणि जागरुक करणे हा त्याचा उद्देश होता.
- कार्यक्रमादरम्यान एका विद्यार्थिनीने,सरकार अनेक गोष्टी मोफत देत आहे. मग ते आम्हाला २० ते ३० रुपयांत मिळणारं सॅनिटरी पॅड देऊ शकत नाहीत का? अशी विचारणा केली.
आयएएस अधिकारी महिलेचे अजब वक्तव्य!
- यावर वरिष्ठ आयएएस अधिकारी हरजोत कौर यांनी उत्तर दिले की, ‘अशा मागण्या काही संपणार नाही. सरकारकडे आज २०-३० रुपयांचं सॅनिटरी पॅड देऊ मागाल. उद्या जीन्स पँट, परवा चपला. शेवटी जेव्हा कुटुंब नियोजनाची वेळ येईल तेव्हा कंडोमही मोफत मागाल.
- सरकारकडून काहीही घेण्याची गरजच काय? हा विचारच चुकीचा आहे.
- त्यावर विद्यार्थिनीने उत्तर दिले की, जनतेच्या मतांनीच सरकार बनते.
- यावर महिला अधिकारी म्हणाल्या, ‘हा मूर्खपणाचा कळस आहे. मतदान करू नका, पाकिस्तानात जा.
- विद्यार्थिनी पुढे यावर म्हणाली की, मी भारतीय आहे. मी पाकिस्तानात का जाऊ? तर महिला अधिकारी म्हणाल्या, ‘तुम्ही पैसे आणि सेवांसाठी मत देता का?’
वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या अबज उत्तरांचा फेरा सुरूच राहिला…
- जेव्हा दुसऱ्या विद्यार्थिनीने सांगितले की, तिच्या शाळेतील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे.
- अनेकदा मुलंही त्यात प्रवेश करतात.
- यावर अधिकारी हरजोत कौर बमरा यांनी विद्यार्थ्यालाच एक बेतुका प्रश्न विचारला.
- त्यांनी विचारले की तुमच्या घरात वेगळे शौचालय आहे का?
- तुम्ही लोक अशाच वेगवेगळ्या गोष्टी मागत राहिल्या तर कसे चालेल, असे त्यांनी विद्यार्थिंनीना सांगितले.
- ते पुढे म्हणाले की, विचार बदलण्याची गरज आहे. तुम्ही स्वतःला भविष्यात कुठे पाहता हे तुम्ही ठरवायचं असतं.
- तुम्ही आता जिथं बसला आहात तिथं बसायचं की जिथं मी बसेल आहे तिथं? सरकार यासाठी तुम्हाला काहीच मदत करू शकत नाही.