मुक्तपीठ टीम
बिहारमधील महिला आयएएस अधिकारी हरजोत कौर यांचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. ज्यामध्ये महिला आयएएस अधिकारी एका विद्यार्थीनीने सॅनिटरी नॅपकिनबद्दल विचारलेल्या प्रश्नावर अतिशय बेजबाबदारपणाने बोलत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेतली. यानंतर हरजोत कौर यांनी माफीही मागितली. दरम्यान या महिला आयएएस अधिकारीला प्रश्न विचारणाऱ्या रिया कुमारीचं सर्वत्र कौतुक होत असताना आता तिला दिल्लीतील एका सॅनिटरी पॅड निर्मिती कंपनीकडून जाहिरातीची ऑफर मिळाली आहे. तिच्या पदवीपर्यंतच्या अभ्यासाचा खर्चही कंपनी उचलणार आहे अशी माहिती मिळाली आहे.
पटनाच्या कमला नेहरू नगरमध्ये राहणाऱ्या रियाला सॅनिटरी पॅड कंपनीकडून कंपनीच्या कमर्शियलची जाहिरात करण्याची ऑफर मिळाली आहे. रियाने सांगितले की, “कंपनीने तिना एका वर्षासाठी सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच तिला कंपनीच्या व्यावसायिक मदतीत सामील होण्याची ऑफर दिली आहे आणि पदवीपर्यंतच्या तिच्या अभ्यासाचा खर्च उचलण्याचे आश्वासनही दिले आहे.”
रियाने ‘पाळी’ या विषयावर मोकळेपणाने बोलण्याच्या गरजेवर भर दिला
- ती म्हणाली की, पूर्वी लोक यावर उघडपणे चर्चा करत नसत, पण आता आम्ही घरोघरी जाऊन लोकांना त्याबद्दल जागरुक करू आणि त्यांना हे समजावून सांगू की हे लपवता येत नाही पण सॅनिटरी पॅडने तो दूर केला जाऊ शकतो.
- बिहारमधील एका कार्यक्रमात तिने मुलींना सॅनिटरी पॅड मोफत देण्याची मागणी केली होती.
- यावर बिहार महिला विकास निगमच्या व्यवस्थापकीय संचालक हरजोत कौर म्हणाल्या, आज तुम्ही सॅनिटरी पॅड्स मागत आहात, उद्या तुम्ही कंडोम मागाल.
- या वक्तव्यावर अनेकांनी आयएएस अधिकारी कौर यांना फटकारले.
रीया कुमारीने म्हटलं, “माझा प्रश्न चुकीचा नव्हता!”
- २० वर्षीय विद्यार्थिनी रिया म्हणाली की, माझा प्रश्न चुकीचा नव्हता. मी सॅनिटरी नॅपकिन्सच्या किंमतीवर प्रश्न विचारू शकते.
- अनेक गरीब मुली आहेत ज्यांना हे परवडत नाही. मॅडमनी यांचा दुसरा अर्थ काढलेला असावा.
- असे असू शकते की, त्या आपल्याला स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करत असतील, जेणेकरून आपण सरकारवर अवलंबून राहू नये. असे रीया म्हणाली.