Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आर्यन खानला अटक झालेल्या मुंबईतील ड्रग्स प्रकरणाचे बिहार कनेक्शन!

बिहारच्या तुरुंगातील तस्करांना रिमांडवर घेण्यासाठी मुंबई एनसीबीचे प्रयत्न

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
aryan khan

मुक्तपीठ टीम

मुंबईत शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक झाल्यामुळे गाजलेल्या क्रूज ड्रग्स प्रकरणाचे कनेक्शन बिहारशी असल्याचे उघड झाले आहे. मुंबई एनसीबीने अटक केलेल्या आठ आरोपींपैकी एक हा बिहारच्या मोतीहारी मध्यवर्ती कारागृहात जेरबंद असलेल्या अंमली पदार्थ तस्कर विजय वंशी प्रसादचा नातेवाईक आहे.

 

विजय हा मुंबईतील मालाड पूर्वमधील कुरार गावात राहत असे. तेथेच राहणारा मोहम्मद उस्मान शेख त्याचा साथीदार आहे. उस्मान शेखही सध्या मोतीहारी मध्यवर्ती कारागृहातही आहे. दोन्ही अंमली पदार्थ तस्करांना मुंबई एनसीबीची टीम चौकशीसाठी सात दिवसांच्या ट्रांझिट रिमांडवर घेत आहे. त्यासाठी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

 

एनसीबीची टीम आणि कांदिवली पश्चिम पोलीस स्टेशन मोतिहारीमध्ये तळ ठोकून आहेत. विजय आणि उस्मान यांच्याविरोधात मोतिहारीच्या चकिया पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचे IO चकिया पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कुमार यांनी दुजोरा दिला आहे.

 

मुंबईतील ड्रग्स पार्टीचे बिहार कनेक्शन

  • मुंबई ते गोवा फेऱ्या मारणाऱ्या क्रूझवर ड्रग्स पार्टी झाली होती.
  • त्या पार्टीवर धाड घालत एनसीबीने आर्यन शाहरुख खानसह आठजणांना अटक केली होती.
  • एनसीबीच्या चौकशीत एका आरोपीने बिहारच्या मोतीहारी सेंट्रल जेलमध्ये बंद असलेल्या ड्रग स्मगलर विजय वंशी प्रसादचा नातेवाईक असल्याची माहिती दिली आहे.
  • विजय त्याच्या सहकाऱ्यांसह बिहारमधील मोतिहारी सेंट्रल जेलमध्ये आहे.
  • ती माहिती मिळाल्यानंतर एनसीबीने मोतिहारी पोलीस आणि तुरुंग प्रशासनाशी संपर्क साधला आणि त्याची चौकशी केली.
  • न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, उस्मान आणि विजय यांना ट्रांझिट रिमांडवर मुंबई एनसीबीच्या ताब्यात देण्यात येईल.

 

ड्रग्स माफियांचे जाळे नेपाळ ते मुंबई वाया मुंबई

  • शाहरुख खानचा मुलगा आर्यनसोबत क्रूझवर पकडलेल्या आरोपीनी महत्वीची माहिती दिली आहे.
  • ड्रग्स माफियांचे संबंध नेपाळ आणि उत्तर बिहारमधील मुजफ्फरपूरच्या अनेक तस्करांशी जोडले जात आहे.
  • मुजफ्फरपूर मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या नेपाळमधील तीन आणि मुजफ्फरपूरच्या कटरा पहसौलमधील तीन तस्करांविषयी एनसीबीकडून माहिती घेण्यात आली आहे.
  • त्यांचा गुन्हेगारी कारवायांचा रेकॉर्डही जमवला जात आहे.
  • महाराष्ट्रातील मालाड पश्चिम येथील दीपक उर्फ टार्जन ऊर्फ बाबा या ड्रग्स सिंडिकेटचा किंगपिन असल्याचे सांगितले जाते.
  • नेपाळच्या उस्मान, विजय, प्रकाश, सात्विक, संजय आणि गौरव कुमार, मुझफ्फरपूरच्या कटरा पहसोलचा बन्सो कुमार आणि रुपेश शर्मा हे दीपकसाठी काम करतात.
  • नेपाळहून ड्रग्स घेत ते बिहारमार्गे रस्त्याने मुंबईत पुरवले जात असे.

Tags: Aryan Khanbiharmumbaiएनसीबीक्रूज ड्रग्स प्रकरणबिहारमुंबईशाहरुख खान
Previous Post

मुंबईत कोरोनानं रविवारी एकही मृत्यू नाही!

Next Post

राज्यपाल मलिकांचा भाजपाला सल्ला…किमान हमी दरासाठी कायदा बनवा! शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेल!!

Next Post
governor satya pal malik

राज्यपाल मलिकांचा भाजपाला सल्ला...किमान हमी दरासाठी कायदा बनवा! शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेल!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!