मुक्तपीठ टीम
कोरोना महामारीत कामी आलेल्या सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या १० महिन्यांत सोन्याच्या किंमतीत १२ हजाराहून अधिक घसरण झाली आहे. दिल्लीतील सराफ बाजारामध्ये सोन्याच्या किंमतीत २१७ रुपयांने घट होऊन किंमत ४४,३७२ रुपये झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याची किंमत ५६,५९० रुपयांवर पोहोचली होती. हा आतापर्यंतचा सोन्याच्या किंमतीचा सर्वोत्तम उच्चांक ठरला होता.
दरम्यान, गेल्या काही काळापासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदार पेचात पडले आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करायची की नाही या संभ्रमात आहेत. सोन्याच्या गुंतवणूकीतून आकर्षक परतावा मिळतो हे खरे आहे. परंतु आता गुंतवणूकदारांसमोर गुंतवणूकीसाठी अनेक नवीन पर्याय उपलब्ध झाल्यामुळे याचे परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे.
का होत आहे घट?
- लसीकरणाच्या प्रगतीमुळे गुंतवणूकदार अधिक करून रिटर्न, शेअर मार्केट, बॅन्ड मार्केटकडे वळत आहेत. त्यामुळे सोन्याच्या बाजारात निच्चांक आल्याचे दिसत आहे.
- तसेच बॅन्ड मार्केटमध्ये अचानक उच्चांक गाठल्याने गुंतवणूकदार त्या दिशेकडे वळत आहेत.
- अमेरिकन डॉलरशिवाय रुपयाची स्थिती मजबूत होत असल्याने भारतात सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाला आहे.
गुंतवणूकदारांनी काय करावे?
- सोन्यामध्ये गुंतवणूक करणे हे गुंतवणूकदारांसाठी हा विश्वसनीय क्षेत्र बनल होतं.
- तसेच सिक्युरिटीजची तुलना करता सोन्यात केलेली गुंतवणूक ही कमी जोखमीची असते.
- सध्याची स्थिती चांगली नसली तरी मागील वर्षी सोन्यातून गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न मिळाले आहेत.
- गेल्या वर्षी सोन्यातून गुंतवणूकदारांना २८ टक्के रिटर्न मिळाले. त्याआधी जवळपास २५ टक्के रिटर्न मिळाले होते.