मुक्तपीठ टीम
गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांची निवड झाली आहे. भाजपा विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. आजवरची धक्कातंत्राची परंपरा कायम ठेवत भाजपा श्रेष्ठींनी भूपेंद्र पटेल यांचं नाव जाहीर केलं आहे.
नितीन पटेल, पुरुषोत्तम रुपाला, मनसुख मांडविया आणि आर.सी.फालदू यांच्या नावाची चर्चा जोरात असतानाच त्यांचं नाव जाहीर होणं, आमदारांसाठीही धक्कादायक होते. माजी मुख्यमंत्री आनंदीबाई पटेल यांच्या मतदारसंघात २०१७मध्ये त्यांच्या जागी भाजपाची उमेदवारी मिळालेले भूपेंद्र पटेल आता पाच वर्षांनंतर एकेकाळी आनंदीबाई पटेलांच्या ताब्यातील मुख्यमंत्रीपदावर पोहचले आहेत.
चर्चेत होती ही नावं…
- नितीन पटेल
- पुरुषोत्तम रुपाला
- मनसुख मांडविया
- आर.सी.फालदू
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा दुपारी राजीनामा…सकाळी पंतप्रधान मोदी काय बोलले?