Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्रात नाही, बिहारमध्ये सुरु झाल्याचा दावा!

बाबू जनेश्वर सिंह यांनी १८८६च्या आसपास बिहारच्या शंकरपूरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केल्याचा दावा

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ganeshotsav 12-9-21 B

छायाचित्रकार स्वप्निल शिंदे


मुक्तपीठ टीम

गणेशोत्सव म्हटलं की महाराष्ट्र! महाराष्ट्र म्हटलं की गणेशोत्सव!! एवढं जवळचं नातं असणारा उत्सव म्हणजे बाप्पांचा उत्सव. महाराष्ट्र आणि खास करुन मुंबई, पुण्यात गणेशोत्सव अगदी धूमधडाक्यात साजरा केला जातो. यंदाही कोरोनाचं सावट असल्याने नियमांचं पालन करत गणेशोत्सव साजरा केला जात आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचा शुभारंभ आपल्याला महाराष्ट्रात झाला, हा आजपर्यंत आपल्याला माहित असलेला इतिहास आहे. मात्र, आता बिहारमधील काही तज्ज्ञांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा शुभारंभ महाराष्ट्रात नाही तर बिहारमधील मिथिलामध्ये झाल्याचा दावा केला आहे.   इतिहासकारांनी केलेल्या दाव्यानुसार देशात सर्वात आधी बिहारमधल्या मिथिलामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे.

 

काय आहे बिहारमधील माध्यमांचा दावा?

  • महाराजा रुद्र सिंह यांचे नातू आणि महाराजा लक्ष्मेश्वर सिंह यांचे भाऊ आणि आप्त सचिव बाबू जनेश्वर सिंह यांनी १८८६ च्या आसपास सध्याच्या मधेपुरा जिल्ह्यातल्या शंकरपूरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती.
  • महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाचा शुभारंभ झाला तो १८९३ मध्ये, म्हणजे बिहारमधील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शुभारंभाच्या सात वर्षांनी असा दावा करण्यात येत आहे.
  • सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रणेता बिहार असल्याच्या दाव्याच्या समर्थनार्थ अलाहाबाद महाविद्यालयाचे माजी कुलगुरु डॉ. सर गंगानाथ झा यांच्या आत्मचरित्रामध्ये असलेल्या उल्लेखाचा दाखला दिला जात आहे.

 

सर गंगानाथ यांच्या आत्मचरित्रात उल्लेख

  • १८९३ मध्ये दरभंगामध्ये येण्यापूर्वी बाबू जनेश्वर सिंह यांनी शंकरपूरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती.
  • सर गंगानाथ यांनी उत्सवात पुरोहिताची भूमिका बजावली होती.
  • नोकरी गमावल्यानंतर सर गंगानाथ यांनी अलाहाबादकडे प्रस्थान ठेवलं.
  • सर गंगानाथ यांच्या आत्मचरित्रात उल्लेख केल्यानुसार फक्त शंकरपूरच नव्हे तर दरभंगा, राजनगर यासारख्या महत्वपूर्ण ठिकाणीही गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जात होता.
  • दरभंगाच्या महाराजांच्या कार्यकाळात कोसी क्षेत्रात शंकरपूरचं वेगळंच महत्व होतं.

 

बाबू जनेश्वर सिंह सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते?

  • सार्वजनिक गणेशोत्सव राजा आणि प्रजा एकत्रित साजरा करत होते.
  • १९३४ पर्यंत दरभंगा हे समृद्धीचं प्रतिक होतं. मात्र भूकंपाचे धक्के बसल्यानंतर याला पूर्णविराम मिळाला.
  • बाबू जनेश्वर सिंह यांनी आपल्या कार्यकाळात अनेक शिक्षण संस्था स्थापन केल्या.
  • त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांमध्ये ग्रंथालय, संस्कृत विद्यालय, धर्मशाळा यांचा समावेश होता.
  • आजवर सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते म्हणून लोकमान्य टिळक यांचा उल्लेख केला जातो. आता मात्र या बिहारमधील दाव्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते बाबू जनेश्वर सिंह असल्याचा नवा दावा समोर आला आहे.

Tags: babu janeshwar singhbiharganesh festivalganeshotsavganeshotsav 2021Lokmanya TilakMaharashtraबिहारमहाराष्ट्रलोकमान्य टिळकसर जनेश्वर सिंहसार्वजनिक गणेशोत्सवसार्वजनिक गणेशोत्सव २०२१
Previous Post

गुजरातेतही भाजपा श्रेष्ठींचं धक्कातंत्र! चर्चेतील चारही नावे बाजूुला…भूपेंद्र पटेल नवे मुख्यमंत्री!

Next Post

राज्यात ३ हजार ६२३ नवे रुग्ण, २ हजार ९७२ बरे होऊन घरी परतले!

Next Post
MCR 4-8-21

राज्यात ३ हजार ६२३ नवे रुग्ण, २ हजार ९७२ बरे होऊन घरी परतले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!