मुक्तपीठ टीम
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि भूतानचे अर्थमंत्री ल्योन्पो नमगेय शेरिंग यांनी संयुक्तपणे भूतानमध्ये भारताचे भीम यूपीआय अॅप सुरू केले. व्हर्च्युअल लॉन्चिंगच्या निमित्ताने निर्मला सीतारमण म्हणाल्या की दरवर्षी भारतातून २ लाखाहून अधिक लोक भूतानला भेट देतात. भीम अॅप लाँच झाल्यावर ते तेथे पेमेंट करण्यात सक्षम होतील. सिंगापूरनंतर भीम यूपीआय अॅप वापरणारा भूतान हा दुसरा देश बनला आहे.
भारताचं आपलं भीम यूपीआय अॅप
• भारत इंटरफेस फॉर मनी म्हणजेच भीम अॅप हा एक डिजिटल पेमेंट अॅप्लिकेशन आहे.
• भीम यूपीआयद्वारे कार्य करतो.
• लॉकडाऊन दरम्यान भीम-यूपीआय एक मोठा पेमेंट प्लॅटफॉर्म बनला.
• २०२०-२१ मध्ये त्यावर ४१ लाख कोटी रुपयांचे २२ अब्ज व्यवहार झाले.
यूपीआय म्हणजे काय?
• युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) एक त्वरित रिअल-टाइम पेमेंट सिस्टम आहे जी वापरकर्त्यांना रिअल-टाइममध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास अनुमती देते.
• वापरकर्ते कोणत्याही बँकेतून इतर कोणत्याही बँकेत पैसे पाठवू शकतात.
• यामध्ये एखाद्याला त्याच्या बँक खात्याचा तपशील सांगावा लागणार नाही.
• सन २०२० मध्ये यूपीआयच्या माध्यमातून ४५७ अब्ज डॉलर्सचा व्यवसाय झाला.
• हे देशाच्या जीडीपीच्या सुमारे १५% इतके आहे.
देशाच्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या एनपीसीआय इंटरनेशनल पेमेंट्स लिमिटेडने भूतानच्या रॉयल मॉनिटरी अथॉरिटी बरोबर भागीदारीची घोषणा केली. त्यामुळे आता भूतानमध्ये भीम यूपीआय क्यूआर आधारित पेमेंट केले जाऊ शकते.
भूतान भारताचे रूपे कार्ड देखील वापरते
भीम-यूपीआय सुरू झाल्यानंतर भूतान हा पहिला देश बनला आहे जेथे युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) च्या मानदंडावर क्यूआर तयार केला जाईल. याशिवाय भूतान हा एकमेव असा देश असेल जिथे भारताचे रुपे कार्ड वापरले जाते.