उदयराज वडामकर/ कोल्हापूर
वर्षभर मानेवर कष्टाचे जोखड ठेवून वाहणाऱ्या बैलाचा पुजण्याचा व कृषिसंस्कृतीचा सण, बेंदूर म्हणून ओळखला जाणारा आजचा सण. आपल्या बैलाने वर्षभर काबाड कष्टाने याच्या हिमतीवर बळीराजा अन्नधान्य ,जमीन मशागती, मालवाहतूक करून मालकाला सुखी व संपन्न ठेवतो. त्यामुळे आज बैलांचा सण बैलांना बळीराजा खरे दैवत व घरचा सदस्य मानतो .
या दैवताची मनोभावे पूजा करण्याचा आजचा दिवस म्हणून बळीराजाने बेंदुर हा सण साजरा करतो .
कैलास पर्वतावर शंकर व माता पार्वती हे सारी पाठातून पार्वती मातेने डाव जिंकतात.या डावातील दोघातील वाद न सुटल्याने साक्षीदार नंदीने शंकराच्या बाजूने मान हरवली असता माता पार्वतीने चिडून जाऊन नंदी देवाना श्राप दिला तू जन्मभर कष्ट उपसशिल या भीतीने नंदी देवाने मातेकडे उपशाप मागताच पार्वती मातेने नंदी ना दिला तु ला शेतकरी वर्षातील एक दिवस तुझी पूजा करून त्या दिवशी तुझ्या मानेवरील जोखंड ठेवणार नाही. तुझी पूजा करेल याऊ शापातून नंदी देव मुक्त होऊन .
बेंदूर हा सण साजरा केला जातो. बेंदूर सणाच्या दिवशी बैलांना अंघोळ घालून शिंगे रंगवून पाठीवर झूल कपाळावर वेगवेगळी चिन्हे आदिने सजवण्यात येते .
गोड धोड पक्वान्ने करून तसेच औषधी वस्तूचे अंड्याचे मिश्रण करून बैलाला पाजले जाते. वेगवेगळी सजावट करून वाजंत्री घेऊन मिरवणूक काढतात. बेंदूर या सणाचे औचित्य साधून बैलाच्या अंगावर कोल्हापुरातील ज्वलंत प्रश्न लिहून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.