Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उद्योगपती राहुल बजाज यांचं निधन: उद्योग क्षेत्रातील ‘स्वाभिमानी’ पर्व हरपलं! उद्योगी धडाडी, ताठर बाणा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Rahul Bajaj

मुक्तपीठ टीम

भारताचे प्रसिद्ध उद्योगपती बजाज समूहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाच दशकांमध्ये बजाज समूहातच नाही तर देशाच्या उद्योग क्षेत्रात राहुल बजाज यांचं योगदान खूप मोठं होतं. त्यांना २००१ साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

 

राहुल बजाज यांचा उद्योगी प्रवास…

  • राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ रोजी कलकत्ता येथे एका मारवाडी कुटुंबात झाला.
  • हे सुखवस्तू कुटुंब व्यावसायिक असल्याने घरातच उद्योगी वृत्तीचे बाळकडू मिळाले.
  • राहुल बजाज यांचे शालेय शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनॉन या शाळांमधून झाले.
  • त्यांनी १९६८ साली दिल्लीतील सेंट स्टीफन महाविद्यालयातून इकॉनॉमिक्स विषय घेऊन बी.ए ही पदवी मिळवली.
  • मुंबईत परतल्यावर, दोन वर्ष सकाळी सरकारी विधी महाविद्यालयात कायद्याचा अभ्यास करता करता बजाज इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उमेदवारी केली.
  • १९६४ साली त्यांनी हार्वर्ड विद्यापीठाची व्यवस्थापन क्षेत्रातील (एम.बी.ए.) पदवी प्राप्त केली.
  • ते बजाज ग्रुप उद्योग समूहाचे चेअरमन व२ राज्यसभेचे सदस्य होते.
  • राहुल बजाज यांचा विवाह १९७१ साली रुपा घोलप या मराठी तरुणीसोबत झाला.
  • या जोडप्यांना राजीव, संजीव आणि सुनयना अशी तीन मुलं आहेत.
  • औद्योगिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना २००१ साली पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.

 

राहुल बजाज यांचे नेहरू घराण्याशी घनिष्ठ संबंध

  • राहुल बजाज यांचे आजोबा जमनालाल बजाज हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते.
  • राहुल यांच्या आजोबांना महात्मा गांधी आपला पाचवा पुत्र मानत असत.
  • जमनालाल बजाज हे जवाहरलाल यांचेही खूप जवळचे मित्र होते.
  • काँग्रेस पक्षाच्या उभारणीत व राष्ट्रीय चळवळीत त्यांचे योगदान महत्वाचे होते.
  • बजाज आणि नेहरू या घराण्याचे गेल्या तीन पिढ्यांचे कौटुंबिक संबंध आहेत.
  • कमलनयन आणि इंदिरा गांधी दोघे काही काळ एकाच विद्यालयात शिकत होते.
  • कमलनयन यांच्या पहिल्या अपत्याचे राहुल हे नाव स्वतः जवाहरलाल नेहरू यांनी सुचवलेलं होतं.
  • राहुल यांचे बालपण अतिशय शिस्तीच्या वातावरणात गेले. कमलनयन बजाज हे महात्मा गांधींच्या वर्ध्यातील संन्याशी आश्रमात वाढले.

१९६५मध्ये राहुल यांच्याकडे बजाज समूहाची सूत्र हाती…

  • राहुल बजाज यांनी १९६५ मध्ये बजाज समूहाची जबाबदारी स्वीकारली.
  • त्यांच्या नेतृत्वाखाली बजाज ऑटोची उलाढाल ७.२ कोटींवरून १२ हजार कोटींपर्यंत पोहोचली आणि स्कूटर विकणारी देशातील आघाडीची कंपनी बनली.
  • २००५ मध्ये राहुल यांनी कंपनीची कमान मुलगा राजीवकडे सोपवण्यास सुरुवात केली.
  • त्यानंतर त्यांनी राजीव यांना बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक बनवले, त्यानंतर ऑटोमोबाईल उद्योगातील कंपनीच्या उत्पादनांची मागणी केवळ देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही वाढली.

Tags: bajaj autoIndia BusinessmanRahul Bajajबजाज ऑटोराहुल बजाज
Previous Post

आदित्य ठाकरेंची भाजपाविरोधात डरकाळी! तिथं घोडेबाजार, आमच्याकडे वाघ, पण बाजार नाही!

Next Post

महाराष्ट्र जीएसटीची कारवाई, १११ कोटींची करचुकवेगिरी, दोघांना सुरतमधून अटक

Next Post
Maharashtra GSt

महाराष्ट्र जीएसटीची कारवाई, १११ कोटींची करचुकवेगिरी, दोघांना सुरतमधून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!