मुक्तपीठ टीम
बजाज ऑटोने पल्सर रेंजमध्ये नवीन पल्सर एन१६० एडीशन लाँच केली आहे. पल्सर एन२५० आणि पल्सर एफ२५० नंतर पल्सर लाइनअपमधील हे तिसरे मॉडल आहे. पल्सर एन१६०ची रचना एन२५ सारखीच आहे. कंपनीने बजाज पल्सर एन१६०ची भारतीय बाजारपेठेत एक्स-शोरूम किंमत १,२५,८२४ रुपये निश्चित केली आहे.
इंजीन आणि पॉवर
- बजाज पल्सर एन१६० मध्ये १६४.८सीसी, ऑइल-कूल्ड, सिंगल-सिलेंडर लहान इंजिन आहे.
- हे इंजिन १६ पीएस पॉवर आणि १४.६५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते.
- ट्रान्समिशनसाठी ५-स्पीड गिअरबॉक्स युनिट देण्यात आले आहेत.
- पल्सर एन१६० चे पॉवर आउटपुट १.२ एचपी ने कमी झाले आहे परंतू टॉर्क आउटपुट समान आहे.
काही खास फिचर्स…
- बजाज पल्सर एन१६० मध्ये सिंगल चॅनल आणि डबल चॅनल एबीएसचा पर्याय आहे.
- बजाज पल्सर एन१६०चा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील पल्सर एन२५० सारखाच आहे
- बजाज पल्सर एन१६० ला ट्विन व्हर्टिकल एलईडी टेल लॅम्प, स्प्लिट ग्रॅब रेल आणि Y-आकाराचे अलॉय व्हील देखील आहे.
- १६० सीसी मॉडेलला एक्झॉस्ट आहे.
- हे यूएसबी चार्जिंग पोर्ट, १४-लिटर इंधन टाकी आणि डीगी अॅनेलोग इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह सुसज्ज आहे जे गियर पोजेशन, घड्याळ, मायलेज आणि रेंज दर्शवते.
- नविन मोटरसायकलला एलईडी डेटाइम रनिंग लाइट्ससह एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आहेत.
ब्रेकिंग आणि सस्पेंशन
- पल्सर सिरीजच्या नवीन बाइकमध्ये ३७ मिमी टेलिस्कोपिक फोर्क आणि मोनो-शॉक वापरला आहे.
- बाइकला १७-इंच चाके १००/८०-१७ फ्रंट टायर आणि १३०/७०-१७ बॅक टायर आहेत.
- ब्रेकिंगसाठी, ड्युअल-चॅनल एबीएस वर्जनमध्ये २३०mm बॅक डिस्कसह मागील बाजूस ३००एमएम फ्रंट डिस्क आहे.
- एक सिंगल-चॅनेल एबीएस वर्जन देखील आहे.
- सिंगल-चॅनल वर्जनचे वजन १५२ किलोग्रॅम आहे, तर ड्युअल-चॅनेल एबीएस वर्जनचे वजन १५४ किलो आहे.