मुक्तपीठ टीम
अमरावतीत दिवाळीनिमित्त खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा घरोघरी मोफत किराणा वाटत आहे. यावरून प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याचं नाव न घेता टीका केली. येथे आधी खिशे कापणारे मग किराणा वाटणारे महाठग, महाअवलादी कमी आहेत का? असा खोचक प्रश्न करत राणा दाम्पत्यावर टीकास्त्र सोडलं.
काय म्हणाले बच्चू कडू?
- अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शिंदे गटाचे आमदार व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची रक्ततुला करण्यात आली होती.
- या कार्यक्रमात आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली.
- काही ठिकाणी मतं मिळवायची असतील तर राजकीय नेत्याला रक्ताची आहुती द्यावी लागते.
- मी रक्तदान करून निवडणुकीचा अर्ज भरला होता.
- राजकीय मंडळींनी दान करण्याची प्रवृत्ती ठेवणं महत्त्वाचं आहे.
- नाहीतर येथे आधी खिशे कापणारे मग किराणा वाटणारे महाठग, महाअवलादी कमी आहेत का?
- त्यांनी नाव न घेता राणा दाम्पत्याला खोचक टोला लगावला आहे.
राणा दाम्पत्यावर अप्रत्यक्ष निशाणा!!
- गोरगरीबांचे खिशे कापायचे, त्यांच्या खिशात हात घालायचा.
- लोकशाहीचं पतन करायचं.
- राजकारणाची ऐशी की तैशी करायची,असे नेते आपल्यात कमी नाहीत.
- ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला, त्या अधिकाराचं पतन करत आम्ही पुन्हा किराण्यावर निवडून येतो, असं सांगणाऱ्या महाठगाला सुद्धा आपण पाहतोय.