मुक्तपीठ टीम
प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. राणांनी केलेल्या या आरोपावरून बच्चू कडू आक्रमक झाले असून त्यांनी १ नोव्हेंबरपर्यंत रवी राणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अल्टिमेटम दिला आहे. बच्चू कडूंच्या अस्तित्वाच्या लढाईत राणा लक्ष्य तर आहेच पण त्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे शिंदे-फडणवीस त्रस्त झाल्याचे दिसत आहे. बच्चू कडू यांनी ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत का गेले यामागचे कारण सांगतानाच उद्धव ठाकरेंबद्दल आजही मला आस्था असल्याचं सांगणं युतीसाठी धोक्याचं मानलं जातं.
त्यामुळे शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला…
- अपंगांचे प्रश्न घेऊन मी अनेकदा त्यांच्याकडे गेलो. ते सर्वसामान्यांची कामं करायला तयार असायचे.
- पण आजूबाजूचे लोक कामच करायचे नाहीत.
- अधिकारी वर्ग टाळाटाळ करायचा.
- त्यामुळे लोकांची कामं व्हायची नाहीत.
- लोक विचारायचे की तुम्ही आता सत्तेत आहात राज्यमंत्री आहात.
- मग कामं का होत नाहीत?
- दिव्यांग लोकांच्या संदर्भात अडीच वर्षात एकही मिटिंग झाली नाही, हे योग्य नाही.
- त्यामुळे शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला.
उद्धव ठाकरेंबद्दल आजही मला आस्था आहे!!
- मतदार संघातील प्रश्न प्रलंबित होते.
- लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सत्तेत असणं गरजेचं आहे.
- एकनाथ शिंदे माझे चांगले मित्र आहेत, त्यामुळे ठरवलं की लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिंदेसोबत जायचं.
- उद्धव ठाकरेंबद्दल आजही मला आस्था आहे.
- पण ठाकरे मातोश्रीवर जेवढे शोभून दिसायचे. लोकांची कामं व्हायची.
- तसं त्यांचं काम वर्षा बंगल्यावर म्हणजेच मुख्यमंत्री झाल्यावर तसं दिसलं नाही.