मुक्तपीठ टीम
बंगळुरूहून जयपूरकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका महिलेने मुलीला जन्म दिला. विमान प्रवाशांमध्ये एक महिला डॉक्टर होती. तिने इंडिगोच्या क्रू मेंबर्सच्या मदतीने त्या महिलेची यशस्वी प्रसुती केली. बाळ आणि महिला सुरक्षित आहेत.
नेमकं काय घडलं?
- इंडिगोचे विमान फ्लाइट क्रमांक 6E-469 या क्रमांकाच्या उड्डाणासाठी पहाटे ५:४५ वाजता बंगळूरहून निघाले.
- आठ वाजता हे विमान जयपूरला येणार होते.
- सीट क्रमांक २ ए वर बसलेल्या ललिता नावाच्या महिलेला विमान हवेत असतानाच अचानक प्रसुती कळा सुरु झाल्या.
- ही घटना कळताच विमानातील डॉक्टरांनी प्रवाशांमध्ये कोणी डॉक्टर आहे का हे पाहण्यासाठी घोषणा केली.
- विमानात एक महिला डॉक्टर, सुबहाना नझीर देखील प्रवास करीत होत्या.
- डॉ. नझीरने कर्मचाऱ्यांच्या मदतीने विमानात ललितांची यशस्वी प्रसुती केली.
- दरम्यान, विमान कर्मचाऱ्यांनी जयपूर विमानतळ प्रशासनाला याची माहिती दिली.
- विमानतळ प्रशासनाने डॉक्टर आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था केली.
- यानंतर या महिलेला आणि मुलीला सुरक्षितरीत्या रुग्णालयात पाठविण्यात आले.
डॉ. नझीर यांचा गौरव
- फ्लाइटमध्येच सदर महिलेची प्रसूती करणाऱ्या डॉ. नझीर यांना एअरलाइन्सने गौरविले.
- डॉ. नझीर यांना एअरलाईन्सकडून थँक्स यू कार्ड देण्यात आले.
- फ्लाइटमधील प्रवाशांनीही यशस्वी प्रसूतीबद्दल आनंद व्यक्त केला आणि डॉ. नझीर यांच्याविषयी आभार व्यक्त केले.
- बाळाच्या जन्मानंतर फ्लाइटमध्ये खूप उत्सवाचे वातावरण होते.
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अचानक उमटलेला ताण काही क्षणातच आनंदात बदलून गेला.