Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अल कायदाच्या अयमान अल जवाहिरीला ठार मारणं अमेरिकेसाठी का महत्वाचं होतं?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ayman al-Zawahiri killed in US drone strike

मुक्तपीठ टीम

अल कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरी याला ड्रोन हल्ल्यात ठार केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. २०११ मध्ये ओसामा बिन लादेनच्या हत्येनंतर अल कायद्याला बसलेला हा सर्वात मोठा धक्का आहे. अफगाणिस्तानात सीआयएने केलेल्या ड्रोन हल्ल्यात जवाहिरीचा खात्मा करण्यात आला आहे. ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांना न्याय मिळवून देण्याबाबत बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले की, जवाहिरीच्या खात्म्याने अल कायदाचे नेटवर्क देखील कमकुवत होईल. अल-जवाहिरीला ठार मारण्याच्या या यशस्वी कारवाईत कुठल्याही प्रकारे नागरिकांची जीवितहानी झाली नसल्याचा अमेरिकेचा दावा आहे.

९/११ च्या हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळाला…

  • बायडन म्हणाले की, माझ्या सूचनेनुसार शनिवारी काबुल, अफगाणिस्तानमध्ये ड्रोन हल्ला यशस्वीपणे करण्यात आला, ज्यामध्ये अल कायदाचा नेता अयमान अल-जवाहिरी मारला गेला.
  • ११ नोव्हेंबर २००१ च्या हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या दिशेने हे आणखी एक पाऊल आहे. आता न्याय मिळाला आहे.
  • आता मी अफगाणिस्तानला दहशतवाद्यांसाठी अजिबात सुरक्षित ठिकाण बनू देणार नाही.
  • तसेच, भविष्यातही असे होणार नाही, हे मी लक्षात ठेवेन.

९/११ च्या हल्ल्यात जवाहिरीची मदत!!

  • इजिप्शियन डॉक्टर आणि सर्जन जवाहिरीने ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेत झालेल्या हल्ल्यात चार विमाने अपहरण करण्यात मदत केली होती.
  • यातील दोन विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या (WTC) दोन्ही टॉवरला धडकली.
  • तर तिसरे विमान अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या म्हणजेच पेंटागॉनला धडकले.
  • चौथे विमान शँकविले येथील शेतात कोसळले.
  • या घटनेत ३ हजार लोकांचा मृत्यू झाला होता.
  • ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर २००१ च्या उत्तरार्धात अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानातील तालिबान सरकार पाडले तेव्हा बिन लादेन आणि जवाहिरी दोघेही पळून गेले.

नंतर बिन लादेनला अमेरिकन सैन्याने २०११ मध्ये पाकिस्तानात ठार मारले…

  • दहशतवादविरोधी कारवाईचा एक भाग म्हणून हा हल्ला !!
  • रविवारी सीआयएने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये ड्रोन हल्ला केला.
  • प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये अल-कायदाविरोधात दहशतवादविरोधी कारवाई सुरू केली आहे.
  • ही कारवाई पूर्णत: यशस्वी झाली असून यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
  • अफगाणिस्तानमध्ये दहशतवादविरोधी कारवाईचा एक भाग म्हणून हा हल्ला करण्यात आला.

Tags: AfganistanAmericaAyman Al ZawahiriJeo BidenOsama Bin Ladenअध्यक्ष जो बायडेनअफगाणिस्तानअमेरिकाअयमान अल-जवाहिरीओसामा बिन लादेनदहशदवाद
Previous Post

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या डहाणूतील घरावर महिला काँग्रेसची धडक

Next Post

मराठा समाजाचे EWS आरक्षण बेकायदा ठरवण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात तातडीने आव्हान द्या! – डॉ. संजय लाखे पाटील

Next Post
Dr sanjay Lakhe Patil

मराठा समाजाचे EWS आरक्षण बेकायदा ठरवण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात तातडीने आव्हान द्या! - डॉ. संजय लाखे पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!