मुक्तपीठ टीम
अल कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरी याला ड्रोन हल्ल्यात ठार केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. २०११ मध्ये ओसामा बिन लादेनच्या हत्येनंतर अल कायद्याला बसलेला हा सर्वात मोठा धक्का आहे. अफगाणिस्तानात सीआयएने केलेल्या ड्रोन हल्ल्यात जवाहिरीचा खात्मा करण्यात आला आहे. ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांना न्याय मिळवून देण्याबाबत बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले की, जवाहिरीच्या खात्म्याने अल कायदाचे नेटवर्क देखील कमकुवत होईल. अल-जवाहिरीला ठार मारण्याच्या या यशस्वी कारवाईत कुठल्याही प्रकारे नागरिकांची जीवितहानी झाली नसल्याचा अमेरिकेचा दावा आहे.
९/११ च्या हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळाला…
- बायडन म्हणाले की, माझ्या सूचनेनुसार शनिवारी काबुल, अफगाणिस्तानमध्ये ड्रोन हल्ला यशस्वीपणे करण्यात आला, ज्यामध्ये अल कायदाचा नेता अयमान अल-जवाहिरी मारला गेला.
- ११ नोव्हेंबर २००१ च्या हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या दिशेने हे आणखी एक पाऊल आहे. आता न्याय मिळाला आहे.
- आता मी अफगाणिस्तानला दहशतवाद्यांसाठी अजिबात सुरक्षित ठिकाण बनू देणार नाही.
- तसेच, भविष्यातही असे होणार नाही, हे मी लक्षात ठेवेन.
९/११ च्या हल्ल्यात जवाहिरीची मदत!!
- इजिप्शियन डॉक्टर आणि सर्जन जवाहिरीने ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेत झालेल्या हल्ल्यात चार विमाने अपहरण करण्यात मदत केली होती.
- यातील दोन विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या (WTC) दोन्ही टॉवरला धडकली.
- तर तिसरे विमान अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या म्हणजेच पेंटागॉनला धडकले.
- चौथे विमान शँकविले येथील शेतात कोसळले.
- या घटनेत ३ हजार लोकांचा मृत्यू झाला होता.
- ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर २००१ च्या उत्तरार्धात अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानातील तालिबान सरकार पाडले तेव्हा बिन लादेन आणि जवाहिरी दोघेही पळून गेले.
नंतर बिन लादेनला अमेरिकन सैन्याने २०११ मध्ये पाकिस्तानात ठार मारले…
- दहशतवादविरोधी कारवाईचा एक भाग म्हणून हा हल्ला !!
- रविवारी सीआयएने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये ड्रोन हल्ला केला.
- प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये अल-कायदाविरोधात दहशतवादविरोधी कारवाई सुरू केली आहे.
- ही कारवाई पूर्णत: यशस्वी झाली असून यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
- अफगाणिस्तानमध्ये दहशतवादविरोधी कारवाईचा एक भाग म्हणून हा हल्ला करण्यात आला.