Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

अविश्वसनीय सत्यकथेवर आधारलेल्या ‘ऐ जिंदगी’चा ट्रेलर रिलीज, रेवती, सत्यजीत दुबे आणि मृण्मयी गोडबोलेंच्या भूमिका!!

October 9, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Aye Zindagi Trailer

मुक्तपीठ टीम

उदयोन्मुख आणि उत्साहवर्धक प्रतिभेच्या पाठिशी उभे राहणारं ‘प्लॅटून वन फिल्म्स’ प्रॉडक्शन हाऊस हे प्रादेशिक चित्रपट निर्मितीसाठी एक बुटीक फिल्म स्टुडिओ आहे. ‘प्लॅटून वन फिल्म्स’ प्रॉडक्शन हाऊस, भारत आणि उत्तर अमेरिकेतील थिएटरमध्ये ‘ऐ जिंदगी’ या हृदयस्पर्शी नव्या चित्रपटासह परतलं असून त्यांच्या निर्मिती संस्थेची ही पहिलीच सोलो निर्मिती आहे.

‘ऐ जिंदगी’ या चित्रपटाचं पोस्टर आणि ट्रेलर सोशल मीडियावर सध्या कमालीच ट्रेंडिंग होत आहेत. एक भावनिक रोलरकोस्टर असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवेल. एका अविश्वसनीय सत्यकथेवर आधारित असलेला ‘ऐ जिंदगी’ हा चित्रपट एका २६ वर्षीय यकृत सिरोसिस रुग्ण विनय चावलाचा प्रवास सादर करणारा आहे. विनयची रुग्णालयातील सल्लागार रेवती यांच्याशी संभव नसलेला बंध, त्याच्या जीवनावरील आशा आणि विश्वास पुन्हा जागृत करतो आणि त्याला मानवतेच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवायला लावतो.

‘ऐ जिंदगी’ हा चित्रपट विविध कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. त्यापैकी मुख्य कारण म्हणजे दक्षिणेकडील ज्येष्ठ अभिनेत्री आणि तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर आपले नाव कोरणाऱ्या रेवती यांचे हिंदी चित्रपटसृष्टीत मुख्य भूमिकेतील पुनरागमन हे आहे. या चित्रपटात ‘मुंबई डायरीज’मधील ब्रेकआउट स्टार सत्यजीत दुबे, ज्येष्ठ गुजराती अभिनेते हेमंत खेर, श्रीकांत वर्मा, सावन टँक, मुस्कान अग्रवाल आणि प्रांजल त्रिवेदी या कलाकारांसोबत ‘चि. व चि. सौ. कां.’ फेम आपली मराठमोळी लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी गोडबोले ‘ऐ जिंदगी’ द्वारे नव्या क्षितिजाकडे वाटचाल करीत आहे.

मृण्मयी गोडबोले म्हणाली की, ‘ऐ जिंदगी’ ही आशा, प्रेम आणि उभारीची कथा आहे. यात खूप आपलेपणाचे वातावरण असल्याने प्रेक्षक प्रत्येक कॅरेक्टरशी स्वत:ला रिलेट करतील. या चित्रपटात मी एका मल्याळम नर्सची भूमिका साकारली आहे, जी माझ्यासाठी नवीन आणि आव्हानात्मक होती. या चित्रपटाच्या कास्ट–क्रू सोबत काम करणे हा माझ्यासाठी एक अद्भुत अनुभव होता. ‘ऐ जिंदगी’ हा चित्रपट येत्या १४ ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारत आणि उत्तर अमेरिकेतील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत असल्याने ती माझ्यासाठी विशेष आनंदाची बाब म्हणता येईल.

‘बॉम्बे रेन्स’, ‘बॉम्बे गर्ल्स’, ‘माईस इन मेन’ आणि ‘द डेथ ऑफ मिताली दत्तो’ या कादंबऱ्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या डॉ.अनिर्बन बोस यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. डॉक्टर बनण्यापासून ते लेखक-दिग्दर्शका पर्यंतच्या या उल्लेखनीय प्रवासावर अनिर्बन सांगतात की, ‘ऐ जिंदगी’ आणि मी सामान्यपणे करत असलेल्या गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. मी एक डॉक्टर असल्यानं रूग्णांची काळजी घेतो, तसंच मेडिकलच्या विद्यार्थ्यांना शिकवतो. मला माझ्या कम्फर्ट झोनबाहेर काढून, आयुष्यातील दोन वर्षे या चित्रपट निर्मितीकरता समर्पित करण्यास प्रवृत्त करणाऱ्या या कथेतील सौंदर्य प्रेक्षकांना प्रेमात पाडल्याशिवाय राहणार नाही. ते पुढे म्हणाले की, ही कथा खूप सुंदर आणि नाट्यमय वळणांनी भरलेली आहे. सर्व कलाकारांनी ज्वलंत अभिनय केला असून, ‘प्लॅटून वन फिल्म्स’ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे.

‘पिकासो’ आणि ‘युअर्स ट्रुली’ सारख्या प्रशंसनीय चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर, ‘प्लॅटून वन फिल्म्स’चे संस्थापक शिलादित्य बोरा लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार्‍या त्यांच्या पहिल्या होम प्रॉडक्शनबद्दल उत्साहित आहेत. ते म्हणाले की, मी अनिर्बनला जवळजवळ १५ वर्षांपासून ओळखतो, जेव्हा मी पहिल्यांदा त्यांची बॉम्बे रेन्स, बॉम्बे गर्ल्स ही अद्भुत कादंबरी विध्यार्थी दशेत असताना वाचली होती, तेव्हाच मी त्यांचे अभिनंदन केले होते. मागील बऱ्याच वर्षांच्या सहकार्यातून आमची मैत्री अधिकाधिक घट्ट झाली आहे. या प्रतिभासंपन्न सर्जकाची कलाकृती रसिकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी होईल ही खात्री आहे. मला अजूनही आठवतं जेव्हा डॉ. अनिर्बननं मला आणि माझ्या पत्नीला रात्रीच्या जेवणाच्या वेळी त्यांच्या एका पेशंटची अविश्वसनीय सत्यकथा सांगितली. ती ऐकून आम्ही सर्व रडलो होतो. तुमच्या आयुष्यात एकदा तुम्ही एक कथा ऐकावी आणि तुम्ही स्वतःबद्दल विचार करावा, ही या चित्रपटाच्या कथेची ताकद असून, हा अनुभव जगलेली व्यक्तीच ही कथा पडद्यावर पेश करीत असल्याने ती अधिक हृदयस्पर्शी झाली आहे. आम्ही हा चित्रपट वैद्यकीय क्षेत्राचा सन्मान वाढविणाऱ्या प्रभूतींना समर्पित करीत असून कोविड पश्चात प्रदर्शित होत असल्याने त्याचे महत्व वाढले आहे.

प्लॅटून वनबाबत – ‘प्लॅटून वन फिल्म्स’ ही संस्था चित्रपट व्यवसायात कार्यरत आहे. आम्ही दर्जेदार निर्मितीसोबतच, कलात्मकमूल्य, विपणन, वितरण आणि सिंडिकेशनवर मुख्यत्वे लक्ष केंद्रित केले असून मोशन पिक्चर व्यवसायासाठी ‘बुटीक फिल्म स्टुडिओ’ निर्मिती केली आहे, याद्वारे चित्रपट व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याचे विशेष काम केले जात आहे. भारतीय चित्रपट उद्योगाला अधिक अर्थपूर्ण आणि फायदेशीर मार्गाने जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यास मदत करणे हे आमच्या संस्थेचे मुख्य ध्येय असून, आमच्या सध्याच्या चित्रपटांमध्ये सबा आझाद, गीतांजली कुलकर्णी आणि नमित दास अभिनीत ‘मिनिमम’, विनय पाठक, मासुमी मखिजा आणि मनु ऋषी चढ्ढा यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘भगवान भरोसे’ आणि ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘तो ती आणि फुजी’ यांचा समावेश आहे.

 


Tags: Ae Zindagi MovieAye Zindagi Trailergood newsMrinmayee GodbolemuktpeethPlatoon One Films ProductionSatyajit Dubeyऐ जिंदगी चित्रपटऐ जिंदगी ट्रेलरचांगली बातमीप्लॅटून वन फिल्म्स प्रॉडक्शनमुक्तपीठमृण्मयी गोडबोलेसत्यजीत दुबे
Previous Post

5G तंत्रज्ञानाचा मिळणार फायदा सर्वांना: काय आहे जियो कॅटल ट्रॅकर? जाणून घ्या ते कसे काम करते? आणि काय करते?

Next Post

पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी नामांकने सादर करण्याची कालमर्यादा आता ३१ ऑक्टोबरपर्यंत

Next Post
Prime Minister's National Child Award

पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी नामांकने सादर करण्याची कालमर्यादा आता ३१ ऑक्टोबरपर्यंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!