Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“प्रजेला मूर्ख बनवता येते तेव्हा राजा पराभवाचाही आनंदोत्सव साजरा करतो!”

September 6, 2026
in व्हा अभिव्यक्त!
0
jitendra & modi

डॉ. जितेंद्र आव्हाड/व्हा अभिव्यक्त

रेमडेसिविर या कोरोनावरील औषधाची निर्यात थांबवण्याचा “महत्वपूर्ण” निर्णय केंद्र सरकारने घेतला ही बातमी टीव्हीवर पाहिल्यावर मस्तकशूळ उठला. याचा अर्थ ही निर्यात अजून सुरु होती? कोरोनाची दुसरी लाट काही आठवड्यांपूर्वी आल्यानंतर या औषधाची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. डॉक्टर्स त्यावर लाल निशाण फडकवत होते. रुग्णांची संख्या काही हजारांनी वाढली तेव्हा तर इतका तुटवडा निर्माण झाला की शेकडो लोक त्याच्या अभावी मरण पावले. रेमडेसिविरचा काळाबाजार सुरु झाला. पण पैसा आणि सत्ता यांच्या व्यसनाधीन झालेल्या मोदी सरकारला लोकांच्या जीवाची किंमत नव्हती. पंतप्रधान तर निवडणूक प्रचार या आपल्या आवडत्या छंदात रमले होते.

आज जवळपास प्रत्येक राज्य आपापल्या तुटपुंज्या साधन सामग्रीनिशी कोरोनाशी लढत आहे. खुद्द पंतप्रधानांच्या गुजरातमध्ये खचाखच भरलेल्या हॉस्पिटलांमध्ये बाहेर पदपथावर रुग्णांवर उपचार केले जात आहेत. अवस्था इतकी वाईट आहे की गुजरात उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेऊन संबंधितांना नोटिसा पाठवल्यात. त्यात कहर म्हणजे कुणी पाटील नावाचे गुजरात प्रदेश भाजपा अध्यक्ष आपल्या घरात रेमडेसिविरचं दुकान उघडून बसलेत. त्यांच्यापाशी इतका साठा कुठून आला याचं उत्तर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडे नाही. काय समजायचं यातून? मोदींना याची कल्पना नसेल अशा भ्रमात रहायचं? मुळात त्यांनी स्वतः काय केलं? भारतासारख्या अफाट लोकसंख्येच्या देशात लसींची अमाप गरज आहे हे माहीत असूनही जगभर भाव खाण्यासाठी ते इतके दिवस लसी निर्यात करत होते. आज प्रत्येक राज्यात लसींचा तुटवडा आहे आणि कोरोनाच्या रुग्णांच्या प्रेतांचे ढीग पडतायत. पण त्यांच्या मनमानी कारभार पद्धतीत बदल नाही. होणारही नाही.

या निर्याती, हे दुर्लक्ष, हा केवळ त्यांच्यातली मानवी संवेदना माणुसकी नष्ट झाल्याचा पुरावा आहे. लोकांना टोचायला लसी नाहीत, लसीकरण केंद्र बंद पडताहेत, आणि मोदी “टिक्का उत्सव” साजरा करताहेत. भक्त त्यात टाळ घेऊन नाचतील. लसीकरणात आपण चिलीसारख्या देशाच्या सुद्धा मागे आहोत याची जाण न ठेवता.

आपण तयार केलेल्या लसी चांगल्या दर्जाच्या नाहीत असं माझं मुळीच म्हणणं नाही. पण परदेशात बनलेल्या लसींबद्दल, अशा आणीबाणीच्या प्रसंगी, मोदींच्या मनात इतकी अढी का, त्यांच्या आयातीवर बंदी का, हे विचारात घेण्याजोगे प्रश्न आहेत. फायझर, जॉन्सन, स्पुटनिक या लसी अख्ख्या युरोप अमेरिकेत वापरल्या जातायत. ज्या भारतीय नागरिकांची ऐपत आहे, ते आपल्या खिशातून पैसे देऊन, आपापल्या डॉक्टरच्या सल्ल्याने या लसी घेतील की! सरकारकडून लस उपलब्ध होईपर्यंत त्यांनी तणावाखाली का जगावं? उलट त्यामुळे सरकारवरचा भार हलका होईल. मोठ्या प्रमाणात लसीकरण चपळाईने होईल. सरकारी लसी राहू दे गोरगरिबांसाठी. पण कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन वगळता आज अन्य जागतिक लसी येऊच द्यायच्या नाहीत या धोरणाला काही अर्थ नाही. किंवा यात काहीतरी ‘अर्थकारण’ आहे. आपण त्याकडे दुर्लक्ष करतोय.

कुणीतरी तत्वज्ञ म्हणून गेलाय, “जेव्हा प्रजेला मुर्ख बनवता येते तेव्हा राजा लढाईतील पराभवाचा सुद्धा आनंदोत्सव साजरा करतो!”

 

(डॉ. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत)

 


Tags: BJPjitendra awhadremdesivirVha Abhivyaktकेंद्र सरकारडॉ. जितेंद्र आव्हाडभाजपरेमडेसिविरव्हा अभिव्यक्त
Previous Post

मुंबई मनपाचा ४९८ कोटींचा जलद खर्च, ३२ शाळांचे काम मात्र संथच!

Next Post

“भीमजयंती समता दिन म्हणून साजरी करण्याच्या ब्रिटिश कोलंबियाच्या निर्णयाचे स्वागत” – रामदास आठवले

Next Post
ramdas athvle

"भीमजयंती समता दिन म्हणून साजरी करण्याच्या ब्रिटिश कोलंबियाच्या निर्णयाचे स्वागत" - रामदास आठवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!