Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

साखरी नाटे गाव…धोका ४० हजारांना रोजगार देणारी सागरी अर्थव्यवस्था करपण्याचा!

September 5, 2026
in व्हा अभिव्यक्त!
0
Sakhri Nate village

अविनाश उषा वसंत / व्हा अभिव्यक्त!

साखरी नाटे. ४००० वा थोड्या कमी जास्ती लोकसंख्येचं गाव. साखरी नाट्यात साधारण ५०० मोठ्या तर २०० च्या वर छोट्या बोटी आहेत. मोठ्या बोटीवर ४० च्या आसपास काम करतात. तर छोट्या बोटावर १० जण काम करतात. हे बघता एकूण २२ हजार लोकांना काम यातून मिळतं. हे फक्त मासेमारीशी निगडित.

Long thread

हे आहे साखरी नाटे.
४००० वा थोडी कमी जास्ती लोकसंख्या. साखरी नाट्यात साधारण ५०० मोठ्या तर २०० च्या वर छोट्या बोटी आहेत.मोठ्या बोटीवर ४० च्या आसपास काम करतात. तर छोट्या बोटावर १० जण काम करतात. हे बघता एकूण २२ हजार लोकांना काम यातून मिळत. हे फक्त मासेमारी शी निगडित(१) pic.twitter.com/7znaD6WVHD

— Avinash Usha Vasant (@aviuv) November 27, 2022

मासे विकणे , त्याचे परिवहन , प्रक्रिया याचा यात उल्लेख नाही. ते धरले तर ४० हजारहून अधिकचा रोजगार केवळ साखरी नाटे हे बंदर देते. एक मोठी बोट व त्यावरचे इतर सामान यांची किंमत साधारण ७० लाखांच्याही वर जात असते. म्हणजे ३५० कोटी हे बोटींसाठी लागलेत आणि दिवसाला ३ कोटींची उलाढाल ह्या बंदरातून होत असते. आजही हे बंदर पुर्ण क्षमतेने कार्य करत नाही. कारण बंदरावर जाण्यासाठी मोठा रस्ता नाही किंवा मोठी जेट्टी सुध्दा नाही. त्याची अंमलबजावणी केली तरी लाखभर रोजगार निर्माण करण्याची क्षमता ह्या ‘गावाची’ आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील क्रमांक दोन नंबरचे मासे ह्या बंदरातून वहन होतात. असे का आहे? तर साखरी नाटे च्या आजुबाजुच्या समुद्रात प्रचंड मासे मिळतात, कारण अत्यंत स्वच्छ समुद्र आणि समुद्राखाली असणारे पान वनस्पतींचे जंगल. स्थानिक मच्छिमार सांगतात की गुजरात मुंबईहून मोठ्या बोटी साखरी नाट्याच्या आसपासच्या समुद्रात मासेमारी साठी येतात. राजकारणी नेहमी रोजगार रोजगार याच पालुपत लावत असतात.ते तर खोट आहेच पण ते दुट्टपी आहे. यासाठी हे लिहलय साखरी नाट्याच्या दक्षिणेला जैतापूर चा प्रकल्प प्रस्तावित आहे तर उत्तरेला प्रस्तावित बारसू रिफायनरी चे क्रूड ॲाईल टर्मिनल आणल गेलय. आणि स्थानिकांना रोजगार मिळेल याच्या आश्वासनावर. ह्या दोन्ही प्रकल्पांचा विचार केला तरी प्रत्यक्ष रोजगार हा ३० हजार च्या वर जात नाही. ह्या दोन्ही प्रकल्पांमुळे तात्काळ नाही पण प्रकल्प उभे झाल्यानंतर काही काळानंतर साखरी नाट्याची मासेमारी हळू हळू नष्ट होत जाणार आहे. आणि त्या मासेमारीच्या परिसंस्थेवर आधारीत ४० ते ५० हजाराचा रोजगार सुध्दा.
म्हणजे सरकारी धोरण किती उरफाटे असू शकतात यासारख वेगळ उदाहरण सापडू शकत नाही. परत विकासच्या गोंडस नावाखाली सुध्दा प्रकल्प हे समुद्र किनारी प्रदेशात नाहीतर जंगलाच्या आसपासच्या प्रदेशात लादले जातात.

पण साखरी नाट्याची आर्थिकता बघितली तर त्या गावाला वा त्याच्या जवळ अशा प्रकल्पांची गरज आहे का ज्या प्रकल्पांमुळे साखरी नाटे ची आर्थिकतेला मोठा धोका पोहचतो हा प्रश्न सतत पडत राहतो.

Image

(अविनाश उषा वसंत हे पीचडी स्कॉलर असून कवी, लेखकाच्या भूमिकेत साहित्य क्षेत्रातही मुशाफिरी करतात.)


Tags: Kokan RefineryRefinerySakhri Nate VillageSay No To Refineryकोकण रिफायनरी प्रकल्पसाखरी नाटे गाव
Previous Post

“आधार कार्ड घेताना त्याची पडताळणी करा”, यूआयडीएआयचा राज्य सरकारला सल्ला!

Next Post

छत्तीसगड मुख्यमंत्र्यांच्या शब्दात…केंद्रीय यंत्रणांची दहशत!

Next Post
Bhupesh Baghel

छत्तीसगड मुख्यमंत्र्यांच्या शब्दात...केंद्रीय यंत्रणांची दहशत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!