Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अविनाश भोसलेंची लंडनमध्ये हजार कोटींची मालमत्ता! खरेदीसाठी घोटाळ्याचा पैसा वापरल्याचा आरोप!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Avinash Bhosale

मुक्तपीठ टीम

प्रसिद्ध येस बँक-डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी पुण्यातील उद्योगपती बिल्डर अविनाश भोसले यांनी लंडनमध्ये हजार कोटींची मोठी मालमत्ता खरेदी केल्याचं समोर आले आहे. सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात, डीएचएफएलकडून मिळालेल्या ५५० कोटींपैकी ३०० कोटी रुपये भोसले यांनी लंडनमध्ये मालमत्ता खरेदीसाठी खर्च केल्याचे म्हटले आहे.

भोसलेंविरोधात सीबीआय न्यायालयात आरोपपत्र दाखल!!

  • दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (DHFL) आणि येस बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने भोसले यांना अटक केली आहे.
  • सोमवारी त्याच्याविरुद्ध विशेष सीबीआय न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
  • मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्र हे सत्यन गोपालदास टंडन, मेट्रोपोलिस हॉटेल्स एलएलपी, एबीआयएल इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, एबीआयएल हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड, अरिंदम डेव्हलपर्स, अविनाश भोसले ग्रुप आणि त्यांच्यावरील गुन्ह्याबद्दल आहे.
  • फ्लोरा डेव्हलपमेंट लिमिटेडचाही आरोपपत्रात उल्लेख आहे.

आरोपपत्रात काय म्हटलं?

  • या प्रकरणातील सह आरोपी संजय छाबरिया यांनी ३१७.४० कोटी रुपये वळते केले.
  • ही रक्कम म्हणजे भोसले यांनी डीएचएफएलला येस बँकेकडून कर्जापोटी दिलेले होते, असे आरोपात म्हटले आहे.
  • सीबीआयच्या मते, एबीआयएल इन्फ्रास्ट्रक्चरला ४३ कोटी रुपये आणि मेट्रोपोलिस हॉटेल्सला १४० कोटी रुपये देण्यात आले होते.
  • डीएचएफएलचे कपिल वाधवान यांनी एप्रिल २०१८ मध्ये येस बँकेने डीएचएफएलमध्ये गुंतवणूक केल्यानंतर लगेच वसुलीसाठी मंजुरी दिली होती.
  • एबीआयएल इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेट्रोपोलिस हॉटेल दोन्हीही भोसले यांच्या मालकीचे आहेत.
  • याशिवाय भोसलेच्या इतर तीन संस्थांना कपिल वाधवन यांनी वित्तपुरवठा केलेल्या अनेक प्रकल्पांसाठी सल्लागार शुल्क म्हणून ६८.८० कोटी रुपये मिळाले, असे आरोपपत्रात म्हटले आहे.
  • एकूणच, भोसले यांच्या कंपन्यांना डीएचएफएलकडून ५६९.२२ कोटी रुपये मिळाले. डीएचएफएलला ही रक्कम येस बँकेकडून मिळाली होती.

अविनाश भोसलेंवर नेमके कोणते आरोप?

  • बहुचर्चित येस बँक आणि डीएचएफएल प्रकरणात गैरव्यवहार करत २९२ कोटी रुपये इतरत्र वळवण्याचा आरोप भोसले यांच्यावर आहे.
  • २०१८ मध्ये ही पैसे वळवल्याचा आरोप सीबीआयने केले आहे.
  • वाधवान यांना येस बँकेकडून कर्ज मिळवून दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
  • सीबीआयच्या मते, यात मोठ-मोठ्या उद्योजकांच्या कंपन्यांचा समावेश आहे.
  • या नेटवर्कमध्ये बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, चित्रपट निर्माते संजय छाब्रिया, बलवा आणि गोएंका यांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे.
  • ईडीकडून याआधी अविनाश भोसले यांची ४० कोटींची संपत्ती जप्त झाली आहे.
  • यात त्यांच्या विविध कंपन्यांचे शेअर्स, मालमत्ता, पुण्यातील पंचतारांकित हॉटेल्सचा समावेश आहे.

Tags: Avinash BhosaleCBIDHFLLondonअविनाश भोसलेलंडनसीबीआय
Previous Post

ममता बॅनर्जींच्या पक्षामागे ईडीपिडा: आता हाकललेल्या मंत्र्याने नोटांचे डोंगर कमवले तरी कसे?

Next Post

ओबीसी आरक्षणाच्या सोडतीनंतर यशवंत जाधवांसह अनेक नगरसेवक वॉर्डवंचित!

Next Post
rakhi Jadhav Yashwant jadhav Mahadeshwar

ओबीसी आरक्षणाच्या सोडतीनंतर यशवंत जाधवांसह अनेक नगरसेवक वॉर्डवंचित!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!