Apeksha Sakpal

Apeksha Sakpal

maharashtra

#व्हाअभिव्यक्त! ” महाराष्ट्राचं वेगळेपण कमी होत चाललंय का ? “

डॉ. गिरीश जाखोटिया नमस्कार मित्रांनो ! गेली पंचेचाळीस वर्षे मी भारतभर हिंडतोय पण महाराष्ट्रासारखं "चतुरस्त्र" राज्य मला भारतात कुठेही आढळलं...

थोडक्यात महत्त्वाच्या : 1)दिवसेंदिवस इंधन दरवाढ होत असतानाच आता ग्रहकांना घरगुती सिलिंडरच्या दरवाढीचा मार सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारने घरगुती सिलेंडरवरील मिळणारे अनुदान टप्प्याटप्प्याने कमी करीत २७० वरून थेट ४० रुपयांपर्यंत खाली आणले आहे. त्यामुळे येत्या काळात अनुदानच संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. 2) नायर रुग्णालयाच्या आवारातील टोपीवाला वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी भीमसंदेश तुपे याने सोमवारी रात्री आत्महत्या केली. भूलशास्त्राच्या पहिल्या वर्षांत शिकणाऱ्या तुपेने भूल देण्यासाठी उपयोग होणाऱ्या दोन इंजेक्शनचे मिश्रण जास्त प्रमाणात टोचून घेतले, अशी माहिती पोलिसांनी दिली. 3) अनधिकृत इमारतीवर कारवाईची धार तीव्र करणाऱ्या महापालिकेकडूनच वीजचोरी केली जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. धोकादायक इमारतीवर कारवाई करण्यासाठी पालिकेने बाजूच्या दुकानातून वीजचोरी केल्याची तक्रार दुकानदाराने केली असून या तक्रारीची दाखल घेत महावितरणने या अनधिकृत कनेक्शनवर कारवाई करत याप्रकरणी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले. 4) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. २९ एप्रिल ते २० मे २०२१ या काळात दहावी बोर्डाची परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे. २३ एप्रिल ते २१ मे या दरम्यान बारावीची परीक्षा घेतली जाऊ शकते. हे संभाव्य वेळापत्रक बोर्डाने जाहीर केले आहे. 5)पिंपरी चिंचवडचा प्रख्यात गुंड गजानन मार्नेला दोन लोकांच्या हत्ये प्रकरणी मुंबईतील तळोजा कारागृहातून मुक्तता करण्यात आली होती. गजाननच्या सुटकेची माहिती मिळताच त्यांच्या ३०० समर्थक ५० गाड्यांच्या ताफ्यासह तळोजा जेलबाहेर पोहचले व बाहेर येताच त्याचे पुष्पवर्षाव करत स्वागत करत एक रोड शो काढण्यात आला.

CM DCM corona meeting

“नियमांचे पालन करा अन्यथा लॉकडाऊनला सामोरे जा”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा

मुक्तपीठ टीम कोरोनाविषयक सर्वत्र दाखविल्या जाणाऱ्या बेफिकीरीबाबत चिंता व्यक्त करतानाच कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची (एसओपी ) कडक अंमलबजावणी करावी, असे...

Nagpur civil hospital

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : २४ तासात ३,६६३ नवीन रुग्ण, सर्वाधिक रुग्णवाढ नागपुरात

मुक्तपीठ टीम मंगळवारी महाराष्ट्रात ३,६६३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २०,७१,३०६  झाली आहे....

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – (१६ फेब्रुवारीपर्यंतचा) • आज राज्यात ३,६६३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २०,७१,३०६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे- • आज २,७०० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १९,८१,४०८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.६६% एवढे झाले आहे. • आज राज्यात ३,६६३ नवीन रुग्णांचे निदान. • राज्यात आज ३९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.४९ % एवढा आहे. • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५३,९६,४४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,७१,३०६ (१३.४५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. • सध्या राज्यात १,८२,९७० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,७२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. • राज्यात आज रोजी एकूण ३७,१२५ सक्रिय रुग्ण आहेत.

accident

दोन इंचाच्या एका पिननं कसा घेतला १५ निरपराधांचा बळी?

मुक्तपीठ टीम जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगावजवळ अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महार्गावर भीषण अपघात घडला आहे. वेगाने जाणारा पपईचा ट्रक उलटून १५ मजुरांचा...

#शेतकरीआंदोलन ग्रेटा थनबर्ग ट्वीट प्रकरणात दिशावर आरोप काय?

#शेतकरीआंदोलन ग्रेटा थनबर्ग ट्वीट प्रकरणात दिशावर आरोप काय?

मुक्तपीठ टीम   ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात बंगळुरूच्या २२ वर्षीय क्लायमेट अॅक्टिव्हिस्ट दिशा रवीच्या अटकेनंतर पोलिसांनी तिच्या साथीदारांचा शोध सुरू...

FasTag must (2)

आजपासून ‘फास्टॅग’ पाहिजेच…आता कसा, कुठे, कधी मिळवायचा?

मुक्तपीठ टीम   आजपासून सर्व चारचाकी वाहनांना टोल भरण्यासाठी फास्टॅग असणे आवश्यक आहे. देशातील कोणत्याही राष्ट्रीय महामार्गाचा टोल नाका ओलांडताना...

whatsapp privacy

व्हॉट्सअॅपला सर्वोच्च न्यायालयाने ठणकावले…लोकांचे खाजगी आयुष्य महत्वाचे!

मुक्तपीठ टीम   सर्वोच्च न्यायालयाने व्हॉट्सअॅपला चांगलेच ठणकावले आहे. तुमच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीमुळे भारतीयांच्या खाजगी आयुष्याच्या गोपनियतेबद्दल अनेक शंका व्यक्त...

milatry-school

इंडियन मिलिटरी कॉलेजची प्रवेश पात्रता परीक्षा ५ जून रोजी

मुक्तपीठ टीम   महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ‘राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून येथे इ. ८ वीसाठी प्रवेशपात्रता परीक्षा’ दि. ०५ जून २०२१...

Page 311 of 327 1 310 311 312 327

ताज्या बातम्या

error: Content is protected !!