Apeksha Sakpal

Apeksha Sakpal

#व्हाअभिव्यक्त! भाजपाच्या षडयंत्राला व गोदी मीडियाच्या दबावाला सरकारने बळी पडू नये!

#व्हाअभिव्यक्त! भाजपाच्या षडयंत्राला व गोदी मीडियाच्या दबावाला सरकारने बळी पडू नये!

सचिन सावंत गेल्या सहा वर्षापासून केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून देशात विरोधी पक्षाची सरकारे अस्थिर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. केंद्र...

varsha gaikwad

कथाकथनास शालेय शिक्षण विभाग प्रोत्साहन देणार

मुक्तपीठ टीम मुलांची क्षमता वाढविण्यासाठी त्यांचे उत्तम संगोपन व त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी आपली आहे आणि कथाकथन हे मुलांच्या...

जनरल : १)हे वर्ष सर्वाधिक उकडायचे मानले जात आहे त्यामुळे शहरातील वाढत्या उकाड्यामुळे सर्वच प्रवासी त्रासलेले आहेत. प्रवाशांनी आता आता लोकल ट्रेन कडून एसी लोकलकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या चार महिन्यांत मध्य रेल्वेच्या एसी लोकलच्या प्रवासी संख्येत हळुहळू वाढ होताना दिसत येत आहे तसेच या काळात ५२ हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी एसी लोकलमधून प्रवासाचा लाभ घेतला आहे. २) रिलायन्स जिओ कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे प्लान्स घेऊन येत असते. रिलायन्स जिओ कंपनीने नुकतीच आपल्या प्रीपेड प्लान्सला कॅटेगरीत विभागले आहे.सुपरल व्हॅल्यू, बेस्टसेलर, आणि ट्रेडिंग या कॅटेगरीमध्ये जिओने प्रीपेड प्लानचा समावेश केला आहे. १९९ रुपयांच्या किंमतीत पोस्टपेड आणि प्रीपेड प्लान उपलब्ध केले आहे. जिओन या प्लानपैकी१९९ रुयांच्या प्लानला बेस्ट सेलर कॅटेगरीत ठेवले आहे. ३) आजकालच्या वाढत्या प्रदूषणामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे निसर्गाचा समतोल बिघडल्याने सर्वाधिक नुकसान हे शेतकऱ्यांचे होते.ऐन उन्हाळ्यात पिकांची काढणी सुरू असताना वादळी वाऱ्यांसह गारपीट झाली. त्यामुळे काढणीला आलेल्या आणि काढणी झालेल्या पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले. नगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शनिवारी सायंकाळी आणि रात्रीच्या सुमारास गारपीट झाली व शेतात आणि रस्त्यांवरही गारांचा खच पडला होता. आधीच करूना मुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा नुकसानीचा फटका बसला. ४) कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पुन्हा दिसून येत आहे अशातच.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहिती त्या ८ राज्यांमध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात, कर्नाटक आणि हरयाणाचा समावेश आहे. या राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीसह देशातील आठ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत देशात ४० हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले असून यातील बहुतेक रुग्ण हे या आठ राज्यांमधील आहेत. केरळमध्येही नवीन रुग्णांची संख्या अधिक आहे. पण तेथील रुग्णवाढीचा ट्रेंड अजूनही घटणाराच आहे. ५) खासदार संजय राऊत हे शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनातील लेख, अग्रलेख, पत्रकार परिषदा आणि वृत्तवाहिन्यांवर मुलाखतीच्या माध्यमातून शिवसेना पक्षाची भूमिका मांडत असतात.ते या सोबतच फेसबुक व ट्विटरवरही ते अनेकदा पोस्ट करत असतात.त्यांच्या सोशल मीडियातून विरोधकांवर निशाणा साधताना ते व्यंगचित्रे व शेरोशायरीवर भर देत असतात.आजही त्यांनी असाच एक शेर ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, यावरुन आता चर्चा रंगली आहे.

क्रिडा थोडक्यात : १) दंगल गर्ल गीता फोगट आणि बबीता फोगाटची मामेबहीण असलेल्या रितिका फोगाटने आत्महत्या केली आहे. राज्यस्तरीय कुस्तीच्या अंतिम सामन्यात केवळ एका गुणाने झालेला पराभव सहन करता न आल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येने कुस्ती क्षेत्रात खळबळ माजली आहे.  कुस्ती क्षेत्रात फोगाट कुटुंबाने नाव कमावलं आहे. रितिकाच्या आत्महत्येने त्यांना मोठा धक्का बसल्याचं कळत आहे. २) कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता त्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या अनेक निर्बंधांचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसल्याचं पाहायला मिळालं आहे. क्रिकेटच्या मैदानांपासून कुस्तीच्या आखाड्यापर्यंत याचे पडसाद उमटले आहेत. पण, अखेर खेळाडूंना मोठा दिलासा देत महाराष्ट्र राज्य शासनानं क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा निर्णय़ घेतला आहे. कोरोना नियमांचं पालन करावं अशी सूचनाही शासनाकडून करण्यात आली आहे. या निर्णयामुळं नऊ महिन्यांनंतर आता खेळाडू पुन्हा एकदा त्यांच्या करिअरच्या वाटांवर लक्ष केंद्रीत करु शकणार आहेत.मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बॅडमिंटन असोसिएशन यांनी आखून दिलेल्या काही नियमांचं पालन खेळाडूंना करणं बंधनकारक असणार आहे. 3) पाचव्या आणि निर्णायक सामन्यात दमदार विजय मिळवत भारताने मालिका ३-२ अशी जिंकली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर भारताने इंग्लंडपुढे २२५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाला मात देत असताना डेव्हिड मलान आणि जोस बटलर यांनी अर्धशतके झळकावत १३० धावांची भागीदारी साकारली. पण हे दोघे बाद झाले आणि इंग्लंडचा संघ विजयापासून दूर गेला. ४) भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि निर्णायक २०-२० भारतीय संघ कसा निवडण्यात यावा, याबाबतचा सल्ला भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने कर्णधार विराट कोहलीला दिला आहे. सचिनने एएनआइला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ” भारतीय संघात फक्त युवा खेळाडूंनाच संधी द्यावी, असा विचार करता कामा नये. कारण युवा खेळाडूंपेक्षा आपल्याला सर्वोत्तम भारतीय संघ कसा निवडता येईल, याकडे लक्ष द्यायला हवे. ५) चौथ्या २०-२० सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला मैदान सोडावे लागले होते. सामन्याच्या १६व्या षटकानंतर कोहली दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला होता आणि त्यानंतर तो मैदानात परतला नव्हता. त्यावेळी रोहित शर्माने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.

aadhar & pan card

आधार – पॅन लिंक नसेल तर दहा हजाराचा फटका! कसं करणार लिंक? वाचा सोप्या टिप्स…

मुक्तपीठ टीम भारतीय नागरिकांसाठी पॅनकार्ड व आधारकार्ड ही दोन ओळखपत्र अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यांची आवश्यकता आपल्याला अनेक ठिकाणी असते. बँकेचे...

amruta fadanvis

“बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी?”- अमृता फडणवीस

मुक्तपीठ टीम मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्राद्वारे गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर विरोधकांनी सरकारला आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना...

hasan mushrif

फडणवीस मोदी-शाहना भेटल्यानंतरचे परमबीरांचे पत्र – हसन मुश्रीफ

मुक्तपीठ टीम राज्याच्या राजकारणासाठी शनिवारची सायंकाळ हादरवून टाकणारी ठरली. सचिन वाझे प्रकरण गाजत असतानाच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्याचे...

Sharad Pawar -111 (2)

अनिल देशमुखांवरील १०० कोटींच्या आरोपांवर शरद पवार काय बोलले?

मुक्तपीठ टीम महाविकास आघाडी सरकारवरच संकटाचे वादळ घोंघावू लागले असताना अखेर महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली....

Page 284 of 327 1 283 284 285 327

ताज्या बातम्या

error: Content is protected !!