Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुणे का बनतेय देशाची कोरोना राजधानी?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
pune

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातच नाही तर देशभर राहण्यासाठी उत्तम मानले जाणारे पुणे सध्या मात्र भीतीचे कारण बनले आहे. हे शहर आणि जिल्हा देशाची कोरोना राजधानी बनताना दिसत आहे. सातत्याने कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या वाढतीच असल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला तोंड देणे हे आव्हानत्मक ठरते आहे. मात्र, पुण्यात कोरोनाचा संसर्ग का फैलावतो त्याची कारणे समजून घेणे आवश्यक आहे.

गेल्या २४ तासांत येथे ५०९८ नवीन प्रकरणे नोंदली गेली. यावेळी ६ लोकांचा मृत्यूही झाला आहे. नवीन रुग्णांचे निदान होण्यामध्ये पुणे देशात आघाडीवर आहे. त्यानंतर नागपूर व मुंबईचा क्रमांक लागतो. अशा परिस्थितीत संसर्गाच्या वाढीच्या कारणांमुळे राज्य सरकारपासून स्थानिक प्रशासन देखील चिंतेत आहेत.

 

पुण्यात कोरोना का वाढत आहे?

पुण्यात कोरोना फोफावण्याची काही कारणे तज्ज्ञ सांगतात:

  • दिवसा आणि रात्री तापमानात मोठ्या प्रमाणात फरक असल्यामुळे फ्लूची शक्यता वाढली.
  • ७० % होम क्वारंटाईन रूग्णांच्या निष्काळजीपणामुळे संसर्ग वाढत आहे.
  • लस आल्यापासून लोकांमध्ये कोरोनाची भीती कमी झाली आहे.
  • वाढते शहरीकरण आणि पुण्यातील रस्त्यांवरील वाढती रहदारी.
  • अधिक चाचण्या आणि अचूक संपर्क ट्रेसिंगचा अभाव.
  • सामाजिक मेळावे, लग्नसोहळे, प्रवास यासाठीची गर्दी
  • शहरात काम करणाऱ्या ग्रामीण भागातील रहिवाशांमुळे कोरोना गावाकडेही पोहचला.
  • नवीन कोरोना स्ट्रेन अधिक संसर्गजन्य असण्याची शक्यता आहे.
  • वारंवार हात धुण्याची आणि योग्यपणे मास्क घालण्याचे प्रमाण कमी झाले.
  • कोरोना प्रकरणात वाढ होण्याचे हे प्रमुख कारण असू शकते.
  • पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढवल्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचेही सांगितले जाते.

 

कोरोना रोखण्यासाठी पुण्यात जास्त निर्बंध 

  • पुढील आदेश येईपर्यंत पुणे महानगरपालिकेतील सर्व सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक उपक्रमांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
  • लग्नाला उपस्थित राहण्यासाठी ५० लोकांची परवानगी आहे.
  • अंत्यसंस्कारासारख्या कार्यक्रमांमध्ये सुमारे २० लोक उपस्थित राहू शकतात.
  • पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कार्यालयांमध्ये (आरोग्य व अत्यावश्यक सेवा वगळता) ५०% कामगार काम करण्याचे आदेश.
  • खासगी कार्यालयांना बहुधा घरातून काम देण्यास सांगितले जात असे.
  • ३१ मार्च पर्यंत पुण्यात रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत नाईट कर्फ्यू असेल.

 

पुणे तिथे काय उणे

  • पुणे हे शिक्षणाचे केंद्र आहे, राज्याची सांस्कृतिक राजधानी मानली जाते.
  • पुणे शहराचा साक्षरता दर ८९.४५% आहे.
  • इज ऑफ लिव्हिंग इंडेक्सद्वारे पुणे हे देशातील दुसरे क्रमांकाचे चांगले शहर आहे.
  • येथे मोठ्या संख्येने आयटी व्यावसायिक आणि वाहन उद्योगांशी संबंधित कर्मचारी राहतात.

Tags: puneकोरोनाकोरोना दुसरी लाटपुणे महानगरपालिका
Previous Post

जनरल : १)हे वर्ष सर्वाधिक उकडायचे मानले जात आहे त्यामुळे शहरातील वाढत्या उकाड्यामुळे सर्वच प्रवासी त्रासलेले आहेत. प्रवाशांनी आता आता लोकल ट्रेन कडून एसी लोकलकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या चार महिन्यांत मध्य रेल्वेच्या एसी लोकलच्या प्रवासी संख्येत हळुहळू वाढ होताना दिसत येत आहे तसेच या काळात ५२ हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी एसी लोकलमधून प्रवासाचा लाभ घेतला आहे. २) रिलायन्स जिओ कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे प्लान्स घेऊन येत असते. रिलायन्स जिओ कंपनीने नुकतीच आपल्या प्रीपेड प्लान्सला कॅटेगरीत विभागले आहे.सुपरल व्हॅल्यू, बेस्टसेलर, आणि ट्रेडिंग या कॅटेगरीमध्ये जिओने प्रीपेड प्लानचा समावेश केला आहे. १९९ रुपयांच्या किंमतीत पोस्टपेड आणि प्रीपेड प्लान उपलब्ध केले आहे. जिओन या प्लानपैकी१९९ रुयांच्या प्लानला बेस्ट सेलर कॅटेगरीत ठेवले आहे. ३) आजकालच्या वाढत्या प्रदूषणामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे निसर्गाचा समतोल बिघडल्याने सर्वाधिक नुकसान हे शेतकऱ्यांचे होते.ऐन उन्हाळ्यात पिकांची काढणी सुरू असताना वादळी वाऱ्यांसह गारपीट झाली. त्यामुळे काढणीला आलेल्या आणि काढणी झालेल्या पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले. नगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शनिवारी सायंकाळी आणि रात्रीच्या सुमारास गारपीट झाली व शेतात आणि रस्त्यांवरही गारांचा खच पडला होता. आधीच करूना मुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा नुकसानीचा फटका बसला. ४) कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पुन्हा दिसून येत आहे अशातच.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहिती त्या ८ राज्यांमध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात, कर्नाटक आणि हरयाणाचा समावेश आहे. या राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीसह देशातील आठ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत देशात ४० हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले असून यातील बहुतेक रुग्ण हे या आठ राज्यांमधील आहेत. केरळमध्येही नवीन रुग्णांची संख्या अधिक आहे. पण तेथील रुग्णवाढीचा ट्रेंड अजूनही घटणाराच आहे. ५) खासदार संजय राऊत हे शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनातील लेख, अग्रलेख, पत्रकार परिषदा आणि वृत्तवाहिन्यांवर मुलाखतीच्या माध्यमातून शिवसेना पक्षाची भूमिका मांडत असतात.ते या सोबतच फेसबुक व ट्विटरवरही ते अनेकदा पोस्ट करत असतात.त्यांच्या सोशल मीडियातून विरोधकांवर निशाणा साधताना ते व्यंगचित्रे व शेरोशायरीवर भर देत असतात.आजही त्यांनी असाच एक शेर ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, यावरुन आता चर्चा रंगली आहे.

Next Post

मास्कचा आणखी एक फायदा…रोग प्रतिकारशक्तीही वाढवा!

Next Post
mask

मास्कचा आणखी एक फायदा...रोग प्रतिकारशक्तीही वाढवा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!